मकर सक्रांतीचा सण जवळ आला आहे. हा सण एकत्र येत साजरा केला जातो. आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने झी मराठी वाहिनीवरील सर्व मालिका एकत्र येत हा सण साजरा करणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. या मालिकांमधील सर्व कलाकार एकत्र आल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, कुशल बद्रिके(Kushal Badrike) व श्रेया बुगडे(Shreya Bugde) हे कलाकारदेखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे.
पारूला मी आदित्यची बायको…
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एक कोर्ट दिसते. हे मनोरंजनाचे कोर्ट असल्याचे म्हटले आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला कुशल बद्रिके म्हणतो मी सगळ्या सासवांच्या बाजूने आहे. श्रेया बुगडेने म्हटले मी सगळ्या सुनांच्या बाजूने असणार आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एका बाजूला पारू, शिवा, सावली, तुळजा उभा आहेत. तर दुसऱीकडे अहिल्यादेवी आहे. श्रेया विचारते, “अहिल्यादेवी तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्विकारणार आहात?” श्रेयाच्या प्रश्नावर अहिल्यादेवी म्हणते की पारूला मी आदित्यची बायको म्हणून स्विकारू शकत नाही. त्यावर कुशल बद्रिके म्हणतो, ऑब्जेक्शन. पारू ही आदित्यची बायको होऊच शकत नाही. असे म्हणून पुढे तो पारू गो पारू हे गाणे म्हणायला सुरू करतो. या कार्यक्रमात सर्वजण खळखळून हसताना दिसत आहेत.
यावर अनेकांनी कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे. “सिताई तर पुढच्या सात जन्मात शिवाला स्विकारणार नाहीत” “आकाश-वसुंधरा, अधिपती-अक्षरा हे का दिसत नाहीत?”, असाही प्रश्न विचारला आहे. तर एका नेटकऱ्याने म्हटले, “लीला भाग्यवान आहे तिला सरोजिनीसारखी सासू मिळाली. आपल्या सुनेला पाठिंबा देते”, असे म्हणत सरोजिनीचे कौतुक केले आहे.
आता या कार्यक्रमात आणखी काय धमाल होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच, चला हवा येऊ द्या या कार्यक्रमानंतर श्रेया बुगडे-कुशल बद्रिकेला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी, त्यांच्या विनोदाने खळखळून हसण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
M