अभिनेता अर्जुन कपूर जितका त्याच्या कामामुळे चर्चेत असतो, तितकाच तो वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतो. गेल्या वर्षी अर्जुनने मलायका अरोराशी ब्रेकअप झाल्याचं जाहीर करत आता सिंगल असल्याचं सांगितलं. पण, नुकत्याच एका कार्यक्रमात दोघं आमने-सामने आले. यावेळी मलायकाचा जबरदस्त डान्स पाहून अर्जुन कपूरने तिचं भरभरून कौतुक केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या अर्जुन कपूर त्याचा आगामी चित्रपट ‘मेरे हसबंड की बीवी’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अर्जुनसह अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. २१ फेब्रुवारीला ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अर्जुन, भूमी आणि रकुल ठिकठिकाणी प्रमोशन करताना पाहायला मिळत आहेत. ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने अर्जुनने ‘इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेज सुपर डान्सर चॅम्पियन टशन’च्या ग्रँड फिनालेला हजेरी लावली होती. या फिनालेमध्ये मलायकाने आपल्या लोकप्रिय गाण्यांवर जबरदस्त डान्स केला. हे पाहून अर्जुनने स्टँडिंग ओव्हशन दिलं.

मलायकाचा जबरदस्त डान्स पाहून अर्जुन कपूर म्हणाला, “काही वर्षांपूर्वीच माझी बोलती बंद झाली आहे. मी आताही गप्प राहू इच्छितो. मला माझ्या आवडीची गाणी आज ऐकायला मिळाली. मलायकाला माहितीये, मला ही गाणी किती आवडतात.”

दरम्यान, गेल्या वर्षी अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचा ब्रेकअप झाला आहे. अर्जुनने स्वतः याबाबत सांगितलं होतं. दादर येथील शिवाजी पार्कातील दीपोत्सव २०२४मध्ये ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी उपस्थित राहिली होती. यावेळी अर्जुन कपूर देखील होता. तेव्हा एका चाहत्याने अर्जुनला ‘मलायका’ अशी हाक मारली. त्यावेळी अभिनेत्याने आता सिंगल असल्याचं सांगितलं होतं.

अर्जुन आणि मलायकाने २०१८पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. सुरुवातीला दोघांनी नातं गुप्त ठेवलं होतं. पण काही काळानंतर दोघांनी जगजाहीर केलं. त्यानंतर अर्जुन आणि मलायका नेहमी एकत्र व्हेकेशनसाठी जाताना दिसायचे. सोशल मीडियावर अनेकदा दोघांनी रोमँटिक फोटोदेखील शेअर केले होते. पण, २०२४मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला. तेव्हापासून अर्जुन आणि मलायका अधूनमधून ब्रेकअप संदर्भात इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत असतात.