मल्याळम मालिकाविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘करुथामुथु’ सारख्या मालिकेत झळकलेल्या अभिनेत्री डॉ. प्रियाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. मल्याळम मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी ती एक होती. वयाच्या ३५व्या वर्षी झालेल्या आकस्मिक निधनाने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रिया ही आठ महिन्यांची गरोदर होती.
हेही वाचा – Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अप्पू करणार मोठा त्याग; नवा प्रोमो आला समोर
डॉ. प्रियाच्या निधनाची माहिती दाक्षिणात्य अभिनेता किशोर सत्याने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटद्वारे दिली. सत्याने तिचा फोटो शेअर करत लिहीलं, “आपली लाडकी अभिनेत्री डॉ. प्रियाचं निधन झालं आहे. ती आठ महिन्यांची गरोदर होती. तिचं बाळ सध्या आयसीयूमध्ये असून ते सुखरुप आहे. त्या बाळाला कुठलाही धोका नाही.”
हेही वाचा – Video: भीषण कार अपघातानंतर पहिल्यांदाच गायत्री जोशी आली समोर; पतीसह एका कार्यक्रमात झाली होती सहभागी
पुढे सत्याने लिहीलं आहे की, प्रिया दररोजच्या आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात गेली होती. त्याच वेळेस तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचं निधनं झालं. एकुलत्या एक मुलीच्या अचानक जाण्यामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. काल रात्री जेव्हा रुग्णालयात गेलो तेव्हा प्रियाच्या पतीचं कसं सांत्वन करू हेच कळतं नव्हतं. देव चांगल्या लोकांबरोबरच क्रूर कसा काय वागू शकतो? जेव्हा ३५ वर्षांची व्यक्ती जग सोडून जाते तेव्हा शोक हा शब्दही पुरेसा नसतो. यातून प्रियाचे आई-वडील आणि पती कसा सावरणार?
हेही वाचा – ‘या’ लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार स्पृहा जोशी, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
दरम्यान, प्रियाचं अचानक निधन झाल्यामुळे मल्याळम मालिकाविश्वामध्ये दुःखाचं वातावरण पसरलं आहे. वयाच्या ३५व्या वर्षी अभिनेत्रीचं निधन झाल्यामुळे कलाकार मंडळी हैराण झाले आहेत.