हिंदी ‘बिग बॉस’ संपल्यानंतर ‘खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोची प्रेक्षकांना आतुरता असते. स्टंटवर आधारित असलेल्या ‘खतरों के खिलाडी’ कार्यक्रमाचं यंदा १५वं पर्व असणार आहे. सध्या या पर्वाची खूप चर्चा रंगली आहे. अजूनपर्यंत ‘खतरों के खिलाडी १५’चं होस्टिंग रोहित शर्मा करणार की दुसरं कोणी? याबाबत निश्चित झालेलं नाही. पण, बऱ्याच कलाकारांना या पर्वासाठी विचारणा झाल्याचं समोर आलं आहे. ‘खतरों के खिलाडी १५’मध्ये बॉलीवूडची बोल्ड, मादक अभिनेत्री झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कलर्स टीव्ही’ वाहिनीवरील ‘खतरों के खिलाडी १५’मध्ये गौतम गुलाटीपासून ते ईशा सिंहपर्यंत अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. याच पर्वात बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्डनेसने घायाळ, पण सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर असणारी इमरान हाश्मीची हिरोईन स्पर्धक म्हणून पाहायला मिळणार असल्याचं समोर आलं आहे. ‘बिग बॉस ताजा खबर’ या इन्स्टाग्राम पेजवर दिलेल्या माहितीनुसार, ‘खतरों के खिलाडी १५’साठी मल्लिका शेरावतला विचारण्यात आलं आहे. अजूनपर्यंत याबाबत निर्माते किंवा मल्लिका शेरावतकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, चित्रपटात काम मिळत नसल्यामुळे मल्लिका शेरावत छोट्या पडद्यावर नशीब आजमावण्याचा विचार करत आहे.

दरम्यान, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम मोहसिन खानदेखील ‘खतरों के खिलाडी १५’साठी निर्मात्यांबरोबर बातचित करत आहे. अजूनपर्यंत निश्चित झालेलं नाही. गेल्या पर्वात मोहसिन खान सहभागी होणार होता. पण हे पर्व सुरू होताच त्याने नकार दिला आणि पुढच्या पर्वात सहभागी होणार असं वचन दिलं होतं. ‘खतरों के खिलाडी १५’मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची सध्या यादीत व्हायरल झाली आहे. ती जाणून घ्या…

  • ईशा सिंह
  • गौतम गुलाटी
  • अभिषेक मल्हान
  • रजत दलाल
  • मनीषा रानी
  • ओरी
  • शगुन पांडे
  • चुम दरांग
  • भाविका शर्मा
  • एल्विश यादव
  • गुलकी जोशी
  • सिद्धार्थ निगम

मल्लिका शेरावतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, २००३ साली ‘ख्वाहिश’ या चित्रपटातून मल्लिकाने बॉलीवूडमध्ये खऱ्या अर्थी दमदार पदार्पण केलं. या चित्रपटात तिने अभिनेता हिमांशू मल्लिकला १७ वेळा चुंबन केलं, ही गोष्ट चांगलीच लक्षवेधी ठरली. यापूर्वी ती २००२ साली ‘जीना सिर्फ मेरे लिए’ या चित्रपटात झळकली होती. पण या चित्रपटातील तिची छोटी भूमिका होती. त्यामुळे १७ वेळा चुंबन करत ‘ख्वाहिश’ या चित्रपटातूनच मल्लिकाचं बॉलीवूडमध्ये पदार्पण झाल्याचं बोललं जातं. त्यानंतर ती एका चित्रपटामुळे रातोरात स्टार झाली. तो चित्रपट म्हणजे २००४ साली प्रदर्शित झालेला ‘मर्डर’.

महेश भट्ट व मुकेश भट्ट निर्मित ‘मर्डर’ या चित्रपटामुळे मल्लिका अधिकच प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटात इमरान हाश्मीबरोबर केलेले बोल्ड सीन, चुंबन सीन यामुळे बॉलीवूडमध्ये तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यानंतर ती ‘किस किस की किस्मत’, ‘बचके रेहना रे बाबा’, ‘प्यार के साइट इफेक्ट्स’, ‘शादी से पेहले’, ‘गुरू’, ‘अगली और पगली’, ‘वेलकम’, ‘हिस्स’, अशा अनेक चित्रपटात तिच्या भूमिका पाहायला मिळाल्या. या चित्रपटातील तिच्या बोल्ड अदाकारीने अक्षरशः तरुणांना वेड लावलं. अशी ही बोल्ड अभिनेत्री ‘खतरों के खिलाडी १५’मध्ये सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.