Man Dhaga Dhaga Jodte Nava Fame Actor Engagement : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहेत. नुकतेच शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे हे दोघंही लग्नबंधनात अडकले आहेत. आता येत्या काही दिवसांत दिव्या पुगावकर, अंकिता वालावलकर अशा अनेक सेलिब्रिटींच्या घरी लग्नसराई सुरू होणार आहे. अशातच आता मराठी मालिकाविश्वात काम करणाऱ्या आणखी एका अभिनेत्यासंदर्भात चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे.

‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजेच अभिषेक रहाळकर. येत्या काही दिवसात अभिषेक लग्नबंधनात अडकणार असून नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला आहे. अभिषेकच्या साखरपुड्यातील इनसाइड फोटो ‘दुर्गा’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रुमानी खरेने शेअर केला आहे. ‘Cutiess’ असं कॅप्शन देत रुमानीने या फोटोमध्ये अभिषेक आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीला टॅग केलं आहे.

prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो

अभिषेकच्या होणाऱ्या पत्नीचं नाव कृतिका असं आहे. रुमानीशिवाय अभिनेत्री अक्षता आपटे आणि स्वानंद केतकर यांनीही या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट शेअर केल्या आहेत. साखरपुड्यातील फोटोमध्ये अभिषेक रहाळकर गुडघ्यावर बसून होणाऱ्या पत्नीच्या हातात अंगठी घालत असल्याचं पाहायला मिळत आहे.

साखरपुड्यात अभिषेकने शेरवानी घातली होती. तर, त्याच्या होणाऱ्या पत्नीने गडद निळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस घातल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय अभिषेक आणि कृतिका या दोघांच्या नावांमधली ‘अ’ आणि ‘क’ ही पहिली अक्षरं वापरून खास लोगो देखील तयार करण्यात आलेला आहे. मात्र, साखरपुड्याची घोषणा अद्याप अभिषेक रहाळकरने केलेली नाही. रुमानी खरेच्या स्टोरीवर ही आनंदाची बातमी सर्वांसमोर उघड झाली आहे. आता अभिनेता या सोहळ्यातील फोटो केव्हा शेअर करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

man dhaga dhaga jodte nava fame actor abhishek rahalkar
रुमानी खरेने शेअर केला अभिषेकच्या साखरपुड्याचा फोटो ( abhishek rahalkar engagement )

दरम्यान, अभिषेक रहाळकरच्या कामाबद्दल सांगायचं, झालं तर त्याने ‘स्टार प्रवाह’च्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारली होती. याशिवाय तो ‘झी मराठी’च्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत सुद्धा झळकला आहे.

Story img Loader