‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेने कथासूत्रानुसार सहा वर्ष पुढे झेप घेतली आहे. मालिकेत सार्थक आणि आनंदी यांच्या दोघांच्या आयुष्यात अनेक आव्हानं समोर येत आहेत. आनंदी निघून गेली त्याला सहा वर्षं लोटून गेली. आता तरी तुझ्या पुढच्या आयुष्याचा विचार कर, असं सार्थकच्या घरातले त्याला वारंवार समजावतात. निदान स्वत:साठी नाही तर घरच्यांच्या समाधानासाठी सार्थक सुखदाशी लग्न करायला होकार देतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याणी नावामागे आनंदी आपली खरी ओळख लपवून आश्रमात लोकांची सेवा करते. भूतकाळातल्या आनंदीला मागे सारत कल्याणी नव्या आयुष्याची सुरुवात करते खरी; पण परिस्थिती अशी काही समोर येते की, कल्याणी खरी आनंदी आहे हे समोर येतं. सहा वर्षांच्या काळात सार्थक आणि आनंदीच्या आयुष्यातली परिस्थिती बदलत गेली; मात्र बदललं नाही ते त्या दोघांमधलं प्रेम. आश्रमाच्या कामासाठी नाशिकला आलेल्या कल्याणीला कोणत्या ना कोणत्या कारणानं नाशिक सोडता येत नव्हतं. अशातच सार्थकला आनंदी त्याच्या अवतीभवती असल्याची जाणीव होते. वारंवार आनंदीचा भास व्हायला लागल्यानं तो शक्य तितकं तिला शोधण्याच्या प्रयत्न करतो. त्याचा हा प्रयत्न यशस्वी होत असल्याची झलक स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. मालिकेचा हा भाग उद्या म्हणजेच ३ सप्टेंबरला पाहता येणार आहे.

हेही वाचा- Video : शिवाची द्विधा मन:स्थिती; गरिबांना गुंडापासून वाचवणार की सीताईचं मन जिंकणार? मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

मालिकेत काय घडणार?

मालिकेच्या उद्याच्या भागात आनंदी आणि सार्थकची भेट होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत सार्थक आनंदीला सोडून जाण्याबद्दल जाब विचारतो. रडवेल्या आवाजात सार्थक आनंदीला म्हणतो, “कुठे होतात इतकी वर्षं का मला न सांगता निघून गेलात?” सार्थकच्या या प्रश्नाला आनंदी काहीच उत्तर देत नाही. या घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या कर आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातून निघून जा, असं तिनं सुधाला म्हणजेच सार्थकच्या आईला दिलेलं वचन आठवतं. त्यानंतर मनावर दगड ठेवून आनंदी सार्थकला सांगते की, आता मी तुमची आनंदी राहिली नाही, तर यांची कल्याणी झाली आहे. या सगळ्यावर काय बोलावं हे सार्थकला कळत नाही. आपण जिच्यावर प्रेम केलं ती आनंदी इतकी कशी बदलली यावर त्याचा विश्वास बसत नाही.”

हेही वाचा – ‘स्टार प्रवाह’वर नव्या मालिकांची नांदी! निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत, जोडीला असतील ‘हे’ अभिनेते, पहिला प्रोमो प्रदर्शित

आनंदी विशालबरोबर निघून जाते तेव्हा सार्थक म्हणतो, “तुमच्या वागण्यामागचं सत्य मी लवकरच शोधून काढेन. सार्थक शोधू शकेल का आनंदीच्या वागण्यामागचं सत्य…?”, अशी कॅप्शन देत मालिकेच्या नव्या भागाची झलक स्टार प्रवाह वाहिनीने पोस्ट केली आहे. सार्थक आणि सुखदाचं लग्न होणार की आनंदी पुन्हा राज्याध्यक्षांच्या घरचं माप ओलांडणार हे आता मालिकेच्या पुढील भागात स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man dhaga dhaga jodte nava serial new twist sarthak met anandi tsg