मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहे. गेल्याच महिन्याच हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर आता आणखी एक अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकला आहे. ‘मन मन उडू झालं’ फेम अभिनेता ऋतुराज फडके नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. ऋतुराजने लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. त्याच्या पत्नीचं नाव प्रिती असं आहे.

ऋतुराजने शुक्रवारी (२७ जानेवारी) प्रितीसह सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली. याआधी २६ जानेवारीला त्याचा साखरपुडा पार पडला. त्याच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निमिश कुलकर्णीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ऋतुराजच्या लग्नातील फोटो शेअर केला आहे. निमिशने फोटो शेअर करत ऋतुराजला त्याच्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा>> ‘पठाण’ चित्रपटाबाबत अतुल कुलकर्णींचं ट्वीट; दीपिका पदुकोणचा भगव्या बिकिनीतील फोटो शेअर करत म्हणाले…

ruturaj phadake wedding

हेही वाचा>> Video:…अन् रणबीर कपूरने सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा फोनच फेकून दिला; व्हिडीओ व्हायरल

झी मराठी वाहिनीवरील ‘मन मन उडू झालं’ ही मालिका लोकप्रिय होती. या मालिकेतून ऋतुराज फडके घराघरात पोहोचला होता. या मालिकेत त्याने कार्तिक ही भूमिका साकारली होती. अनेक नाटकांत व मालिकेत काम केलेल्या ऋतुराजला ‘मन उडू उडू झालं’ मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली.

Story img Loader