अभिनेता अजिंक्य राऊत व अभिनेत्री हृता दुर्गुळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं होतं. मग ते नायकाचं असो किंवा खलनायकाचं प्रेक्षकांनी प्रत्येक पात्राला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होतं. आता या मालिकेतील एक अभिनेता ‘धर्मवीर २’ चित्रपटात झळकणार आहे. याबाबत त्याने ‘धर्मवीर २’ चित्रपटातील सेटवरचे फोटो शेअर करून माहिती दिली आहे.

हेही वाचा – सई लोकूरने लेकीची पहिली झलक शेअर करत सांगितलं नाव, म्हणाली, “आमची परी… “

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. प्रवीण तरडे दिग्दर्शित हा चित्रपट सर्वाधिक लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवे विक्रमही केले होते. त्यानंतर आता लवकरच ‘धर्मवीर २’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २०२३च्या अखेरीस या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील अभिनेता ऋतुराज फडके पाहायला मिळणार आहे.

ऋतुराज फडकेने नुकतेच सोशल मीडियावर ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या सेटवरील फोटो पोस्ट केले आहेत. यामधील पहिल्या फोटोमध्ये ऋतुराज दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याबरोबर पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या व तिसऱ्या फोटोमध्ये तो भूमिकेत पाहायला मिळत आहे. पण तो कोणत्या भूमिकेत झळकणार आहे? हे गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17: नॉमिनेशन टास्कमध्ये ‘बी टीम’ला एक चूक पडली महागात, थेट अंकिता लोखंडेसह ‘हे’ सदस्य घराबाहेर जाण्यासाठी झाले नॉमिनेट

दरम्यान, ऋतुराजच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेनंतर इतर बऱ्याच मालिकांमध्ये झळकला होता. सध्या तो ‘२१७ पद्मिनी धाम’ या नाटकात काम करत आहे. या नाटकात ऋतुराजबरोबर अमृता पवार, सचिन नवरे, अनिकेत कदम, सुबोध वाळणकर आणि मिलिंद शिंदे पाहायला मिळत आहे.

Story img Loader