सध्या मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी आयुष्यातल्या नव्या प्रवासाला सुरुवात करताना दिसत आहेत. कोणी लग्नबंधनात अडकत आहे, तर कोणी साखरपुडा उरकत आहे. प्रसाद जवादे-अमृता देशमुख, शुभंकर एकबोटे-अमृता बने, सुरुची अडाकर-पियुष रानडे यांच्यानंतर आता आणखी अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे.
‘मन उडू उडू झालं’ या गाजलेल्या मालिकेतील अभिनेता विनम्र भाबल लग्नबंधनात अडकला आहे. विनम्रने ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत सत्तू ही भूमिका साकारली होती; जी चांगलीच लोकप्रिय ठरली. असा हा लोकप्रिय सत्तू म्हणजेच विनम्र ८ डिसेंबरला लग्नबंधनात अडकला. पूजा असं त्याच्या बायकोचं नाव आहे.
हेही वाचा – “इतकं जुनं झालंय आमचं लग्न…” दिग्दर्शक विजू मानेंची पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाले, “सुरुवातीलाच प्रचंड…”
विनम्रचा मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. अभिनेत्री हृता दुर्गुळेसह रिना मधुकर, पूर्णिमा तळवलकर, प्राजक्ता परब असे अनेक कलाकार विनम्रच्या लग्न सोहळ्यात दिसले. तसेच काही कलाकारांनी विनम्रच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – Premachi Goshta: कोळी पेहरावात पाहून राज हंचनाळेच्या बायकोची होती ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाली, “घरी…”


दरम्यान, विनम्रच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो मराठी मालिकासह चित्रपट, नाटकांमध्ये झळकला आहे. सध्या त्याच रंगभूमीवर ‘राजू बन गया Zentalman’ हे नाटक सुरू आहे. या नाटकात तो अंशुमन विचारे, उमेश जगताप, अमृता फडके या कलाकारांबरोबर पाहायला मिळत आहे.