मराठी सिनेविश्वातील उत्तम अभिनेत्री व नृत्यांगणा म्हणून अभिनेत्री मानसी नाईकला ओळखलं जातं. ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. याशिवाय मानसीने एका डान्स रिअ‍ॅलिटी शोचं विजेतेपदक सुद्धा पटकावलं आहे. यावेळी तिला ‘हल्लाबोल क्वीन’ हा खिताब देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. याच्या आठवणी मानसीने नुकत्याच अमृता राव यांच्या ‘अमृता फिल्म्स’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्या आहेत. तसेच ‘यापुढे रिअ‍ॅलिटी शो करणार नाही’ असंही तिने स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“रिअ‍ॅलिटी शोमध्ये विजेता पूर्वनियोजित असतो का? किंवा कोणत्याही प्रकारचा पक्षपात केला जातो का?” असा प्रश्न अमृता यांनी मानसीला विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, “रिअ‍ॅलिटी शोमध्ये पक्षपात केला जातो की नाही हे मला खरंच माहिती नाही. कारण, मी जे रिअ‍ॅलिटी शो केले तिथे असं काहीच घडलं नव्हतं. मी प्रचंड मेहनत घेऊन प्रत्येक राऊंडमध्ये परफॉर्म केलं होतं. मला ‘हल्लाबोल क्वीन’ हा खिताब मिळाला होता. पण, यापुढे मी कोणताही रिअ‍ॅलिटी शो करू इच्छित नाही.”

हेही वाचा : Video : शाहरुख खानच्या लोकप्रिय गाण्यावर प्रसाद जवादे व अमृता देशमुखचा जबरदस्त डान्स; म्हणाले, “गोड मानून घ्या…”

मानसी पुढे म्हणाली, “रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्यावर खूप वेगळ्या प्रकारचा तणाव आपल्या डोक्यावर येतो. मी सहभागी झाली होती तो छोट्या पडद्यावरचा एकमेव रिअ‍ॅलिटी शो होता की, ज्यात २० अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या. या सगळ्यांमधून पहिल्या क्रमांकावर येणं, ती मेहनत, एपिसोडचं शूट खरंच खूप जास्त तणाव असतो. प्रत्येकाला या शोच्या नावाप्रमाणे ‘रिअ‍ॅलिटी’ समजते.”

हेही वाचा : ठरलं तर मग : अर्जुनला रंग लावणार प्रिया अन् सायलीचा होणार संताप! भर कार्यक्रमात धक्का मारून सुनावणार खडेबोल, पाहा प्रोमो

“आम्ही तेव्हा रामोजी फिल्मसिटीमध्ये शूटिंग केलं होतं. जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांचं युनिट तिथे काम करत होतं. साडेतीन महिने तिथे एपिसोड्सचं शूटिंग झाल्यावर आमचा महाअंतिम सोहळा मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरला पार पडला होता. या सगळ्यात अभिनेत्रींमध्ये भांडणं, गॉसिप मग, हे गाणं हिलाच का मिळालं? मला का नाही मिळालं? या सगळ्या गोष्टी चालू असायच्या. आम्ही तिघीजणी सोडून इतर सगळ्या अभिनेत्री त्यावेळी मला सीनिअर होत्या. आता मी कोणाचंही नाव घेणार नाही…पण, या गोष्टी मी पाहिल्या आहेत. कारण, भले त्या अभिनेत्री एकमेकींच्या मैत्रिणी होत्या पण, त्याठिकाणी प्रत्येकाला जिंकायचं होतं. ती एक प्रकारची स्पर्धा असते आणि प्रत्येकाला पुढे जायचं असतं.” असं मानसीने सांगितलं.

हेही वाचा : महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू होणार कपूर कुटुंबीयांचा जावई? जान्हवीच्या बॉयफ्रेंडबद्दल वडिलांचं सूचक विधान; म्हणाले…

रिअ‍ॅलिटी शोबद्दल मानसी पुढे म्हणाली, “कठपुतलीपासून, दादा कोंडके, राधा-कृष्ण, माधुरी दीक्षित राऊंड या सगळ्या फेऱ्यांमधून पुढे जात स्वत:ला सिद्ध करावं लागतं. या शोदरम्यान खूप चांगले परीक्षक आम्हाला लाभले होते. त्यामुळे एकंदर त्या शोचा अनुभव खूप चांगला होता.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manasi naik shares her experience of reality show in recent interview sva 00
Show comments