‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. अभिनेत्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर त्याचा शोध सुरू आहे. घरातून दिल्ली विमानतळावर जाण्यासाठी निघालेला गुरुचरण सिंग विमानतळावरही पोहोचला नाही व दिल्लीलाही पोहोचला नाही. अभिनेता बेपत्ता झाल्यावर त्याचा मालिकेतील सहकलाकार ‘आत्माराम भिडे’ म्हणजेच मंदार चांदवडकरने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुचरण वारंवार दिल्ली आणि मुंबई दरम्यान प्रवास करायचा. आपली डिसेंबरमध्ये शेवटची भेट झाली होती, असं ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना मंदार चांदवडकरने सांगितलं. “मला तो बेपत्ता झालाय हे ऐकून धक्का बसला आहे. तो दिल्ली ते मुंबई दरम्यान नेहमी प्रवास करत असतो. डिसेंबरमध्ये दिलीप जोशी यांच्या मुलाच्या लग्नात आम्ही शेवटचे भेटलो होतो. आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला, पण तेव्हापासून आम्ही संपर्कात नाही. सगळं ठिक असावं अशी मी प्रार्थना करतोय,” असं मंदार म्हणाला.

गुरुचरण सिंगचं शेवटचं लोकेशन सापडलं, बेपत्ता झाल्यावर तीन दिवस ‘इथं’ होता अभिनेता, एटीएममधून पैसे काढले अन्…

‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमने गुरुचरण सिंगच्या दिल्लीतील पालम येथील घरी भेट दिली. तो अचानक बेपत्ता कसा झाला याची चौकशी पोलीस करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुरुचरण सिंग दिल्लीतील अनेक भागात पाठीवर बॅग घेऊन चालत फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

गुरुचरण सिंगने बेपत्ता होण्यापूर्वी पाठवलेला ‘हा’ मेसेज, प्रसिद्ध निर्मात्याने दिली माहिती; म्हणाले, “भक्ती त्याला आणायला…”

पोलिसांनी गुरुचरणच्या मोबाईल डिटेल्स तपासल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण २४ एप्रिलपर्यंत दिल्लीतच होता, यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. २४ तारखेला तो पालम येथील त्याच्या घरापासून फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर होता. तपासादरम्यान गुरुचरणचे लग्न होणार असल्याचेही समोर आले आहे. तसेच तो आर्थिक अडचणीतही होता, अशी माहिती कळत आहे.