Marathi Actor Mangesh Desai : मराठी अभिनेते व निर्माते मंगेश देसाई सध्या ‘धर्मवीर २’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आजवर त्यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकतीच त्यांनी ‘बोलूभिडू’ या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांच्याबरोबर अभिनेत्री निर्मिती सावंत देखील उपस्थित होत्या. यावेळी अभिनेत्रीने मंगेश देसाईंना अनेक प्रश्न विचारले. याचदरम्यान त्यांनी वैयक्तिक आयुष्याबाबत देखील खुलासे केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निर्मिती सावंत अभिनेत्याला ( Mangesh Desai ) विचारतात, “तू मला अम्मीजान का म्हणतोस?” यावर मंगेश देसाई सांगतात, “निर्मिती सावंत, निर्मिती ताई, निर्मिती काकू, निर्मितीजी अशी हाक त्यांना बरेच जण मारत असतील. पण, मी त्यांना ‘अम्मीजान’ म्हणतो. त्यांचा कधीही फोन आला तरीही मी त्यांना ‘अम्मीजान’ म्हणतो यामागे एक खास कारण आहे.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : वडिलांना पाहताच अश्रूंचा बांध फुटला! धनंजयच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष; आई अन् पत्नीला पाहिल्यावर केलं असं काही…; पाहा व्हिडीओ

मंगेश देसाईंनी सांगितला किस्सा

अभिनेते ( Mangesh Desai ) पुढे म्हणाले, “‘राहिले घर दूर माझे’ या नाटकामध्ये मी त्यांच्या मुलाची भूमिका करत होतो. माझं नाव होतं जावेद आणि त्या माझ्या आईच्या भूमिकेत होत्या हमिदा. ते नाटक खूपच छान होतं. त्या नाटकाच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि याचदरम्यान आमच्यात एक छान बॉण्डिंग तयार झालं. आमच्या नाटकाचे दिग्दर्शक मला खूप ओरडायचे कारण, सगळेच दिग्गज कलाकार होते…या दिग्गज कलाकारांवर कसं ओरडणार म्हणून सर माझ्यावर ओरडायचे असं कदाचित असेल.”

हेही वाचा : Jigra Trailer : परदेशात अडकलेल्या भावाची सुटका कशी करणार आलिया भट्ट? ‘जिगरा’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, गोष्ट आहे खूपच रंजक

“एके दिवशी रविंद्र नाट्यमंदिरला शो होता आणि ते माझ्यावर कारण नसताना ओरडले आणि तेव्हा तुम्ही ( निर्मिती सावंत ) मला जवळ घेतलं. मला तुम्ही घरी घेऊन गेलात. अविनाश नारकर देखील तेव्हा होते. त्या क्षणाला मी म्हणालो होतो…मी चाललो नाटक सोडून, मला करायचं नाही. पण, तेव्हा तुम्ही जवळ घेऊन मला ज्या आत्मीयतेने सांगितलं… त्या क्षणाला मला जाणवलं हे काहीतरी वेगळं बॉण्डिंग आहे. म्हणून आजही मी तुम्हाला ‘अम्मीजान’ असाच आवाज देतो आणि कधीच त्यांना निर्मिती ताई म्हणत नाही.” असा भावनिक किस्सा मंगेश देसाई ( Mangesh Desai ) यांनी सांगितला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangesh desai reveals why he calls nirmiti sawant ammi jaan sva 00