लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा ११’ च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. वाइल्ड कार्ड स्पर्धक मनीषा रानीने हा शो जिंकला आहे. शोएब इब्राहिमसह इतर चार स्पर्धकांना मागे टाकत मनीषा विजेती ठरली. ट्रॉफीसह तिला ३० लाख रुपये मिळाले, तर तिचा कोरिओग्राफर आशुतोष पवारला १० लाख रुपयांची बक्षिसाची रक्कम देण्यात आली. इतकंच नाही तर मनीषा आणि तिच्या कोरिओग्राफरला अबुधाबीच्या यस आयलंडची फ्री ट्रिपही मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोच्या ग्रँड फिनालेमध्ये ट्रॉफी हातात घेऊन मनीषाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. “स्वप्नं पूर्ण होतात. आज तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे… बिहारमधील एका छोट्या गावातल्या एका मुलीने मोठं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण भारत देश एकत्र आला. झलकच्या प्रवासात ज्यांनी मला इतकं प्रेम दिलं आणि ट्रॉफीही माझ्या हातात दिली त्या सर्वांचे आभार, एवढंच मी म्हणू शकते, ‘आपकी तारीफ में क्या कहें, आप हमारी जान बन गए’. मी खूप आनंदी आहे…”, असं कॅप्शन मनीषाने फोटोंना दिलंय. तिने अनोख्या पद्धतीने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

धोनीला आकाश अंबानीने शिकवलं दांडिया खेळायला, मग थाला अन् ब्राव्होची जोरदार जुगलबंदी, व्हिडीओ पाहिलात का?

‘झलक दिखला जा’च्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये मनीषासह शोएब इब्राहिम, श्रीराम चंद्रा, अद्रिजा सिन्हा आणि धनश्री वर्मा यांचा समावेश होता. फक्त मनीषाच नाही तर धनश्री वर्मानेही वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आणि टॉप पाचमध्ये पोहोचली.

Video : बॉलीवूडचे तीन खान आले एकत्र! अनंत अंबानींच्या प्रे-वेडिंगमध्ये सलमान-शाहरुख व आमिरचा डान्स; गाणं होतं खूपच खास

दरम्यान, हा शो ११ नोव्हेंबर रोजी सोनी टीव्हीवर सुरू झाला आणि २ मार्च रोजी त्याचा ग्रँड फिनाले पार पडला. ‘मर्डर मुबारक’चे कलाकार सारा अली खान, विजय वर्मा आणि संजय कपूर हे फिनालेचे पाहुणे होते. ‘झलक दिखला जा ११’ चे परीक्षक फराह खान, अर्शद वारसी आणि मलायका अरोरा होते. गौहर खान आणि ऋत्विक धनजानी यांनी हा शो होस्ट केला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manisha rani wins jhalak dikhhla jaa 11 shoaib ibrahim adrija sinha runners up know prize money hrc