‘खुलता कळी खुलेना’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या ‘स्टार प्रवाह’च्या ‘मन धागा-धागा जोडते नवा’मध्ये पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी मयुरीची ‘मन धागा-धागा जोडते नवा’ मालिकेत जबरदस्त एन्ट्री झाली. तिच्या एन्ट्रीमुळे या मालिकेला नवं वळणं मिळालं. या मालिकेत मयुरीने सुखदा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. अल्पावधीत मयुरीने साकारलेली सुखदा घराघरात पोहोचली आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीला गणेशोत्सवातील एक गोष्ट अजिबात आवडत नाही, याविषयी तिने नुकतंच परखड मत मांडलं आहे.

अभिनेत्री मयुरी देशमुखने नुकताच ‘तारांगण’ या युट्यूब चॅनलशी संवाद साधला. यावेळी तिने गणेशोत्सव साजरा करण्याबाबत भाष्य केलं. ती म्हणाली, “मला दोन-तीन गोष्टी अजिबात आवडत नाहीत. त्याची दक्षता सगळ्यांची घेतली पाहिजे. म्हणजे अत्यंत लाउड म्युजिक आवडत नाही. कारण म्हातारी लोक असतात. ६० पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींना लाउड म्युजिकचा त्रास होतो. माझ्या घरात माझ्या आजीला बघितलं आहे. कधी कधी माझ्या आई-वडिलांनाही बघते. खूप लाउड म्युजिक नका लावू.”

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Loksatta chaturang padsad loksatta readers response letter
पडसाद : स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर…
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

हेही वाचा – Video: सूरज चव्हाणला येतेय गावची आठवण, म्हणाला, “मी साधा आणि सनकी आहे, पण इथे…”

पुढे अभिनेत्री मयुरी देशमुख म्हणाली, “एन्जॉय करा. मी पण लहानपणी एन्जॉय केलंय आणि अजूनही मला एन्जॉय करायला आवडतं. पण मला वाटतं आवाजाचं भान आपण ठेवू या आणि गाणी कुठली वाजतायत हे देखील महत्त्वाचं आहे.”

“गणेशोत्सव सणाला साजेशीच गाणी वाजली पाहिजे. आपल्याला आपला डिस्को आहे. बाकी गाणी डिस्कोमध्ये लावा किंवा लग्नामध्ये त्या गाण्यांवर नाचा. पण गणपतीचा सण असेल तर त्यावेळी गणपतीचीच गाणी वाजली पाहिजे,” असं स्पष्ट मयुरी देशमुख म्हणाली.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकारांची अचानक झाली भेट, प्रसाद खांडेकर फोटो शेअर करत म्हणाला, “लवकरच…”

हेही वाचा – ‘झी मराठी’वर सुरू होणार ‘लक्ष्मी निवास’! कन्नड मालिकेचा रिमेक, प्रमुख भूमिकांसाठी ‘या’ दोन नावांची चर्चा

लवकरच मयुरीचा ‘हा’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस

दरम्यान, अभिनेत्री मयुरी देशमुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘खुलता कळी खुलेना’ मालिकेनंतर ती हिंदी मालिका आणि काही चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. काही महिन्यांपूर्वी तिचा ‘लग्नकल्लोळ’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मयुरी अभिनेता सिद्धार्थ जाधव व भूषण प्रधानसह झळकली होती. त्यानंतर ‘मन धाग-धागा जोडते नवा’ मालिकेत तिची एन्ट्री झाली. आता मयुरी ‘एक डाव भुताचा’ चित्रपटात दिसणार आहे. ४ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader