अभिनेत्री मनारा चोप्रा ‘बिग बॉस १७’ मुळे चर्चेत आली. बिग बॉसच्या या पर्वात अभिषेक कुमारनंतर मनारा दुसरी उपविजेता ठरली. या शोनंतर मनाराने चाहत्यांच्या मनात तिचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. परंतु, त्याच लोकप्रिय मनाराला आता एका व्हिडीओमुळे खूप ट्रोल केलं जातंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी (१३ मे) बऱ्याच ठिकाणी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी जीवघेणे प्रसंग घडले. मुंबईतील घाटकोपर येथे १०० फुटांचे एक मोठे होर्डिंग कोसळल्यामुळे १४ जणांचा मृत्यू झाला, तर ६४ लोक जखमी झाले. या जखमींवर अजूनही उपचार सुरू आहेत. असे अनेक अपघात सोमवारी अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. बाहेर अशाप्रकारचे वातावरण असताना मनाराने या दिवशी पावसाचा आनंद घेत एक डान्स व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

हेही वाचा… चेहऱ्याला फेस पॅक अन्…, ‘बिग बॉस’ फेम २० वर्षीय अब्दु रोजिकने केली लग्नाची जय्यत तयारी, म्हणाला…

जागोजागी झालेल्या अशा घटनांमुळे लोकं प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यात मनारा असा व्हिडीओ शेअर करत असल्याचं पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.

मनाराचा व्हिडीओ

मनाराने तिच्या बाल्कनीमध्ये पावसाचा आनंद घेत ‘तेरी बातों मे ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटातील गाण्यावर डान्स स्टेप करत व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत मनारा एक दोनदा बाल्कनीतील ग्रिलवर चढून नाचतानादेखील दिसली. “शूटिंगदरम्यान मी पहिल्या पावसाचा आनंद घेत आहे”, असं कॅप्शन मनाराने या व्हिडीओला दिलं.

मनाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मनाराच्या चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर भरभरून प्रतिसाद दिला. परंतु, ट्रोलर्सच्या नजरेतून मनारा काही सुटली नाही. मनाराच्या अशा व्हिडीओवर नाराजी व्यक्त करत एका नेटकऱ्याने कमेंट केली आणि लिहिलं, “या घटनेमुळे १४ लोकं मृत पावले आहेत आणि ही इथे डान्स करतेय.” तर दुसऱ्याने लिहिलं, “इथे सगळे चिंताग्रस्त आहेत आणि हिला नाचायचं आहे, हद्दच झाली हिची.”

तर एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आज मुंबईत अनेक ठिकाणी या वादळात किती लोकांचा बळी गेला आणि किती लोक मरण पावले हे अशा निर्लज्जांना माहीत नाही.”

हेही वाचा… राखी सावंत रुग्णालयात दाखल; ह्रदयाशी संबंधित आजारामुळे बिघडली प्रकृती; फोटो व्हायरल

दरम्यान, मनारा ‘बिग बॉस १७’ मध्ये शेवटची झळकली होती; तर ‘भूतमेट’ या वेब सीरिजमध्येही तिने मुख्य भूमिका बजावली होती. मनारा चोप्रा आणि अभिषेक कुमारचा ‘साँवरे’ नावाचा म्युझिक व्हिडीओ तीन महिन्यांपूर्वी रीलिज झाला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mannara chopra trolled for posting a video while in ghatkopar 14 people died when hoarding collapsed after rain and storm dvr