मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिज्ञा भावेला ओळखले जाते. अभिज्ञा ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करताना दिसते. अभिज्ञाने जानेवारी २०२१ मध्ये मेहुल पै बरोबर लग्नगाठ बांधली. नुकतंच तिने मेहुलच्या वाढदिवसानिमित्त खास फोटो पोस्ट केले होते. यातील एका फोटोमुळे ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अभिज्ञा भावेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मेहुलबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर मेहुल काळ्या रंगाचाच शर्ट परिधान केले आहे. ते दोघेही यावेळी एकमेकांना मॅचिंग करताना दिसत आहेत.
आणखी वाचा : “लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून तुला सोडून…” अंकुर वाढवेने पत्नीसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
या फोटोला कॅप्शन देताना तिने मेहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. अभिज्ञाचा हा फोटो पाहून एकाने तिला ‘गरोदर आहेस का?’ असा प्रश्न विचारला आहे.
तर एकाने तिला “गुडन्यूज आहे का? तुझ्याकडे बघून असं वाटतं आहे”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने तिच्या या पोस्टमधील ‘आहोचेबाबा’ या हॅशटॅगवरुन कमेंट केली आहे.
आणखी वाचा : “माफ करा मला…”, कर्करोगाशी झुंज देणाऱ्या अभिज्ञा भावेच्या पतीची भावनिक पोस्ट
दरम्यान या सर्व पोस्टवर तिचा पती मेहुल पै याने प्रतिक्रिया दिली आहे. मेहुलने यावर दोन इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. या इमोजीवरुन तो आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अभिज्ञा खरोखर गरोदर आहे की नाही, याबद्दल अद्याप त्या दोघांनीही भाष्य केलेले नाही.