अभिनेते-सुत्रसंचालक आदेश बांदेकर कायमच चर्चेत असतात. झी मराठी वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे तर लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमाद्वारे ते महाराष्ट्रभर फिरत असतात. सगळ्यांचे लाडके भावोजी आजवर महाराष्ट्रातील प्रत्येक घरात प्रसिद्ध आहेत. इतकंच नव्हे तर आपल्या लाडक्या भावोजींनी घरी यावं असं प्रत्येकीला वाटतं. आता आदेश बांदेकर यांच्याच घराचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
आणखी वाचा – “दादा आले” म्हणताच भावोजींनी काढला होता पळ, जाणून घ्या सुचित्रा आणि आदेश बांदेकरांची हटके लव्हस्टोरी
आदेश बांदेकर यांनी दिवाळीनिमित्त त्यांच्या घराचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्या घराची झलक पाहायला मिळाली. या व्हिडीओला त्यांच्या चाहत्यांनी अधिकाधिक पसंतीही दर्शवली आहे.
पाहा व्हिडीओ
काळाचौकी परिसरात अभ्युदयनगर भागातील घरामध्ये आदेश यांचं बालपण गेलं. काही वर्ष ते याच छोट्या घरात राहिले. पण आता त्यांचं आलिशान घर आहे. आदेश यांच्या घराचं इंटेरियर लक्षवेधी आहे. या व्हिडीओची सुरुवात त्यांच्या घराच्या नेमप्लेटने होतं. घराच्या नेमप्लेटवरचं नाव लक्ष वेधून घेणारं आहे. सोहम सुचिता आदेश बांदेकर असं या नेमप्लेटवर नाव आहे. पत्नीसह त्यांनी आपल्या मुलाचं नावही नेमप्लेटवर ठेवलं आहे.
आदेश यांच्या घरामध्ये गणपती, स्वामी समर्थ तसेच देव-देवतांच्या मुर्ती आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या घराची सजावटही उत्तम पद्धतीने केली आहे. अप्रतिम, खूप सुंदर, मस्त घर अशा अनेक कमेंट त्यांच्या चाहत्यांनी हा व्हि़डीओ पाहून केल्या आहेत.