अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. काही वर्षांपूर्वी त्याने नवे लक्ष्य या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. सोहम बांदेकरचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. नुकतंच सोहम बांदेकरने त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोहम बांदेकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांसाठी Ask me anything या सेशनचे आयोजन केले होते. यावेळी सोहमने त्याच्या चाहत्यांच्या सर्वच प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी सोहमला त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही काही प्रश्न विचारण्यात आले.
आणखी वाचा : “इतका रिकामी असतोस का?” आदेश बांदेकरांच्या लेकाला चाहत्याचा प्रश्न, सोहम म्हणाला “निकामी…”

सोहमला यावेळी त्याच्या एका चाहत्याने “तुझी गर्लफ्रेंड आहे का?” असा प्रश्न विचारला. त्यावर सोहमने “मला माझं आयुष्य आहे आणि त्यात चांगले मित्रदेखील आहेत”, असे भन्नाट उत्तर दिले.

सोहम बांदेकर

आणखी वाचा : Video : ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर भर चित्रपटगृहात स्त्रियांनी केलं असं काही…, मराठी अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली…

दरम्यान “नवे लक्ष्य” ही सोहमची पहिलीच मालिका होती. या मालिकेत सोहमने जय सुवर्णा दीक्षित ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील निर्मिती सोहम प्रॉडक्शन्सने केली होती. या मालिकेत महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध घेतला गेला होता. त्यानंतर आता तो ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात झळकत आहे. यात त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor aadesh bandekar son soham bandekar answer about her girlfriend question nrp