अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सोहमने आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. स्टार प्रवाहवरील नवे लक्ष्य या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर झळकला. नुकतंच सोहमने एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे तो चर्चेत आला आहे.
सोहम हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो अनेकदा त्याच्या आगामी प्रकल्पाबद्दल माहिती शेअर करत असतो. नुकतंच सोहमने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्याला त्याने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “आज शेवटचा भाग चित्रीत झाला अन्…” आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत
या फोटोत आदेश बांदेकर आणि सोहम बांदेकर यांनी एकाच रंगाचे कपडे परिधान केले आहेत. यात आदेश बांदेकर यांनी निळ्या रंगाचा एक शॉर्ट कुर्ता परिधान केला आहे. तर सोहमने निळ्या आणि पांढऱ्या रंगाची जर्सी परिधान केली आहे. त्याबरोबर त्या दोघांनी गडद निळ्या रंगाची जिन्स परिधान केली आहे.
“अचानक जुळून आलेला योगायोग, त्यामुळे मग संधी गमावली नाही”, असे कॅप्शन सोहमने या फोटोला दिले आहे.
आणखी वाचा : “अवघ्या ५२ व्या वर्षी कर्करोगामुळे…”, अभिनेता पुष्कर जोग वडिलांच्या आठवणीत भावूक
त्याच्या या फोटोवर अनेक कलाकारंनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री सना शिंदेंने या फोटोला कमेंट करताना हार्ट इमोजी शेअर केले आहेत. तर विशाल निकमनेही हार्ट इमोजी शेअर करत त्या दोघांना छान दिसत असल्याचे सांगितले आहे.