महाराष्ट्रातील लाखो महिलांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘होम मिनिस्टर’ला ओळखले जाते. दार उघड बये दार उघड म्हणत सुरु झालेला ‘होम मिनिस्टर’चा हा कार्यक्रम आता २०व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने अभिनेते आदेश बांदेकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

आदेश बांदेकरांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर लाईव्ह केले. या लाईव्हमध्ये त्यांनी ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाबद्दल त्यांना काय वाटते? याबद्दल सांगितले. तसेच त्यांनी प्रेक्षकांचे आभारही मानले.
आणखी वाचा : “राज ठाकरेंच्या घरी गेलो तेव्हा…”, कोकण हार्टेड गर्लने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “ते मुख्यमंत्री…”

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
tharla tar mag arjun confess love for sayali at bus stand
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”

“नमस्कार, होम मिनिस्टर या कार्यक्रमाला १९ वर्ष पूर्ण होतात आणि २० व्या वर्षात आपण पदार्पण करतोय. हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. साधारण आजपासून बरोबर १९ वर्षांपूर्वी १३ सप्टेंबरला पहिला भाग प्रदर्शित झाला होता आणि तिथून हा प्रवास सुरु झाला. मागे वळून बघताना जवळपास ६००० एपिसोड झाले. मला याचा अतिशय अभिमान वाटतो. जगाच्या नकाशावर सोमवार ते शनिवार आनंद देणारा कार्यक्रम आपल्या प्रत्येकाने त्याचा स्वीकार केला.

घराघरातल्या आई, बहिणी, माऊलींचा सन्मान करत तसेच आनंदाची उधळण करत, घरातलं टेन्शन काही काळ नाहीसा करणारा हा कार्यक्रम करता आला. यामुळे मला छान वाटलं. असंच तुमचं प्रेम कायम ठेवा. होम मिनिस्टर या कार्यक्रमाने १९ वर्षे पूर्ण केली. लाखो कुटुंबांनी मला आशीर्वाद दिला.

लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत तुम्ही दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद हे मला कायम समृद्ध करणारा होता. या निमित्ताने मी माझ्या कुटुंबाला सुचित्रा, सोहम आणि माझे वडील यांना मी धन्यवाद म्हणेन. त्यांनी मला कायमच प्रोत्साहन दिलं. घराघरात जाऊन इतका प्रवास करताना त्यांनी मला कधीच नको म्हटलं नाही. त्याच आशीर्वादाच्या जोरावर २० वं वर्षही साजर करुया”, असे आदेश बांदेकर म्हणाले.

आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य

दरम्यान ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय आहे. हा कार्यक्रम सादर करणारे सूत्रसंचालक आदेश बांदेकर हे ‘भावोजी’ म्हणून घराघरात लोकप्रिय झाले आहेत. या कार्यक्रमाने जवळपास १० लाख किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास, ६००० भाग आणि १२००० घर इतका मोठा पल्ला गाठला आहे.

Story img Loader