Marathi Actor Aashay Kulkarni : छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. आजच्या घडीला ओटीटी माध्यमांमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी कलाकारांना छोट्या पडद्यामुळे घराघरांत लोकप्रियता मिळते. मात्र, डेलीसोपमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना अनेकवेळा असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. काही कलाकारांना हक्काचं मानधन देखील मिळत नाही. असाच काहीसा अनुभव छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्याला आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठी मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच आशय कुलकर्णी. काही दिवसांपूर्वीच त्याने एका मालिकेत काम केलं होतं. परंतु, निर्मात्यांनी त्याचं मानधन अद्याप अभिनेत्याला दिलेलं नाही. यासंदर्भात वारंवार फोन, ई-मेल करूनही उत्तर मिळत नसल्याचं आशयने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आशयने याबाबत संताप व्यक्त करत आपलं मत मांडलं आहे. इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक कलाकारांना या समस्येचा सामना करावा लागला आहे.

हेही वाचा : “बोलत नाही म्हणून गरीबांचा फायदा घेतात…”, निक्कीच्या ग्रुपशी भिडण्याचा सूरजचा निर्धार! नेटकरी म्हणाले, “गुलीगत पॅटर्न…”

आशय कुलकर्णीची पोस्ट

“मध्यंतरी मी एका मालिकेत काम केलं. मालिकेने नुकताच ८०० भागांचा टप्पा पार केला. त्या शोचे प्रोडक्शन मॅनेजर, अकाऊंट डिपार्टमेंट, त्या शोचे EP यांना वारंवार फोन केले, मेसेज केले, ई-मेल केले तरी पैसे मिळत नाहीयेत. आमच्याकडून रोज शूटला येण्याची अपेक्षा असते तेही ‘वेळेत’ पण मग वेळेत पैसे देता का येत नाहीत?” असा संतप्त प्रश्न आशयने आपल्या पोस्टद्वारे विचारला आहे.

आशय कुलकर्णीने आतापर्यंत ‘माझा होशील ना’, ‘पाहिले न मी तुला’ या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय ‘मुरांबा’ आणि ‘सुंदरी’ मालिकांमध्ये देखील तो झळकला होता. सध्या आशय ‘सुख कळले’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

हेही वाचा : Glycerine राहिलं, बाहेर आल्यावर पुरस्कार अन्…; जान्हवीने माफी मागितल्यावर मराठी कलाकारांनी उडवली खिल्ली; म्हणाले…

आशय कुलकर्णीची पोस्ट चर्चेत ( Aashay Kulkarni )

हेही वाचा : फोटो काढायला आलेल्या चाहतीचा हात झटकून हेमा मालिनी म्हणाल्या असं काही की…; व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

आशयप्रमाणे यापूर्वी अनेक मराठी कलाकारांना या समस्येचा सामना करावा लागला होता. मात्र, अभिनेत्याने पोस्ट शेअर करताना कोणत्याही मालिकेचं नाव उघड केलेलं नाही. आता त्याचा रोख नेमका कोणाकडे हे कळू शकलेलं नाही. परंतु, अभिनेत्याच्या पोस्टची आता कलाविश्वासह सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.