छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आशय कुलकर्णी २ डिसेंबरला विवाहबद्ध झाला. आशय कुलकर्णी व सानिया गोडबोलेने अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नातील खास क्षणांचा व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन वेडिंग व्हिडीओ शेअर केला आहे. दापोलीतील समुद्रकिनारी आशयने सानियासह सप्तपदी घेत नवीन आयुष्याला सुरुवात केली. कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. लग्नासाठी आशयने पारंपरिक पोशाख केला होता. तर सानियाने जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीत मराठमोळा लूक केला होता.

हेही वाचा>> “मी त्याची…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारासाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट

हेही वाचा>> तरुण मुलाची फोनवरच उर्फी जावेदला शिवीगाळ; अभिनेत्री संतापून म्हणाली “आई-वडिलांना…”

आशयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या लग्नातील खास क्षणांची झलक पाहायला मिळत आहे. दापोलीचा समुद्रकिनारा, एकमेकांना हार घालतानाचे खास क्षण या व्हिडीओमध्ये शूट करण्यात आले आहेत. विराजस कुलकर्णी-शिवानी रांगोळे, सखी गोखले-सुव्रत जोशी यांनीही आशयच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती.

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला मिळाली नवी मालिका, पोस्ट शेअर करत म्हणाली…

आशय व सानियाच्या लग्नाच्या दिवशीच हार्दिक जोशी व अक्षया देवधरही विवाहबंधनात अडकले. हार्दिक-अक्षयाप्रमाणेच आशय व सोनियाच्या लग्नाचे फोटोही व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor aashay kulkarni soniya godbole wedding video viral kak