वाहतूक कोंडी ही मुंबईतील सर्वात मोठी समस्या आहे. पावसाळा, मेट्रो स्थानकांची किंवा रस्त्यांची कामे यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ट्राफिकमुळे अनेकदा आपण नियोजित स्थळी दिलेल्या वेळेत पोहोचू शकत नाही आणि महत्त्वाची कामेही रखडतात. असाच काहीसा अनुभव अभिनेता अभिजीत खांडकेकर सुद्धा आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अनन्या पांडेबरोबरच्या व्हायरल फोटोंवर आदित्य रॉय कपूरने सोडलं मौन; म्हणाला, “सोशल मीडियावर…”

अभिजीतने मुंबईतील वाहतूक कोंडीविषयी शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. अभिजीतने या पोस्टमध्ये स्वत:चा वर्तमानपत्र वाचतानाचा फोटो शेअर केला आहे. यावर अभिनेत्याने लिहिले आहे की, “साडेतीन तास ट्राफिकमध्ये अडकलो आहे…गोरेगाव ते ठाणे घोडबंदर रॉक्स” अभिजीतने मंगळवारी सकाळी ही पोस्ट शेअर केली होती.

हेही वाचा : “७२ वर्षांचा हिरो अन् ३३ वर्षांची हिरोईन”, तमन्ना भाटियाने ट्रोलर्स दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, ” वयाने काय फरक…”

मुंबईतील वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आता रोज फिल्मसिटी ते घर असा प्रवास करणाऱ्या कलाकारांनाही त्रास होत आहे. मध्यंतरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पुणे-मुंबई वाहतूक कोडींविषयी तर, अभिनेते प्रसाद सागर तळाशीकर यांनी पुण्यातील ट्राफिकविषयी संतप्त पोस्ट शेअर केली होती.

हेही वाचा : “मराठी प्रेक्षक मराठी गाणी ऐकायला तयार होत नाहीत…” प्रसिद्ध गायिकेने व्यक्त केली खंत; म्हणाली, “दाक्षिणात्य गाणी…”

दरम्यान, अभिजीत खांडकेकर सध्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. यानिमित्ताने अभिनेता गोरेगाव ते ठाणे या मार्गाने प्रवास करतो. मालिकेत त्याच्यासह अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि तेजस्विनी लोणारी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावरील या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor abhijeet khandkekar stuck in mumbai traffic shared instagram post sva 00