‘बाजी’, ‘नवे लक्ष्य’, ‘शुभविवाह’ यांसारख्या अनेक मालिकांमधून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून अभिजीत श्वेतचंद्रला ओळखले जाते. त्याने त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले. सध्या अभिजीत हा ‘शुभविवाह’ या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत आहे. नुकतंच त्याने या पात्रासाठी कशी तयारी केली, याबद्दल भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिजीत श्वेतचंद्र हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी समथिंग’ सेशन घेतले. यावेळी त्याला त्याच्या चाहत्यांनी विविध प्रश्न विचारले. यावेळी एका चाहत्याने त्याला ‘शुभविवाह’ मालिकेतील अभिजीत पटवर्धन या पात्राच्या तयारीबद्दल प्रश्न विचारला.
आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”

“‘नवे लक्ष्य’ या मालिकेत तू पोलिसांच्या भूमिकेत होता. त्यानंतर ‘शुभविवाह’ या मालिकेत तू खलनायकाचे पात्र साकारलेस, हा बदल कसा घडवून आणलास?”, असा प्रश्न त्याला एकाने विचारला होता. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “मिशी काढली, अंगावर ब्लेझर चढवला, डोळ्यात राग, द्वेष, तिरस्कार घेतला, दात, ओठ चावले, डायलॉग डिलीव्हरी बदलली… अभिजीत पटवर्धन तयार”, असे त्याने म्हटले आहे.

अभिजीत श्वेतचंद्र पोस्ट

आणखी वाचा : “हृदयाला छिद्र, रक्तवाहिन्या बंद आणि फक्त सहा महिने…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाली “तिला भूल देणंही…”

दरम्यान अभिजीत श्वेतचंद्र हा सध्या ‘शुभविवाह’ या मालिकेत झळकत आहे. याआधी त्याने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत काम केले आहे. ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत अभिजीतने पोलिस इन्स्पेक्टर विक्रांत गायकवाड ही भूमिका साकारली होती. त्याबरोबरच तो ‘बाजी’, ‘साजणा’, ‘बापमाणूस’ यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये झळकला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor abhijeet shwetchandra share post talk about how he prepare subhavivah serial nrp