Abhishek Gaonkar and Sonalee Gurav Wedding : ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतील श्रीनू आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकला आहे. अभिषेक गावकर आणि सोशल मीडिया रील स्टार सोनाली गुरव यांचा लग्नसोहळा मालवणात थाटामाटात पार पडला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून यांच्या लग्नातले बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये हे दोघंही लग्नानंतर उखाणा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिषेक आणि सोनाली लग्न केव्हा करणार याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रेक्षकांच्या लाडक्या श्रीनूने ( मालिकेतील नाव ) तो लवकरच लग्न करेल असं सांगितलं होतं. आता त्याच्या लग्न सोहळ्याचे ( Abhishek Gaonkar ) फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

हेही वाचा : Video : रेश्मा शिंदेने घेतला हिंदी उखाणा! ‘रंग माझा वेगळा’च्या टीमने लग्नात केली धमाल, नवरा-नवरीच्या दाक्षिणात्य लूकने वेधलं लक्ष

सोनाली उखाणा घेत म्हणते, “मंगळसूत्र असतं सौभाग्याची खूण, अभिषेकचं नाव घेते गावकरांची सून” यानंतर अभिषेकने सुद्धा बायकोसाठी खास उखाणा घेतला. “आमचा संसार तेव्हाच होईल सुखद, जेव्हा वामिका कापेल भाजी आणि मी लावेन कुकर” हा उखाणा ऐकल्यावर अनेकांना वामिका कोण असा प्रश्न पडला कारण अभिनेत्याच्या पत्नीचं नाव सोनाली आहे. तर, याबद्दल तिने स्वत: पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.

सोनालीने लग्नानंतरचे काही सुंदर फोटो शेअर करत याच्या कॅप्शनमध्ये मिसेस वामिका अभिषेक गावकर असं नाव लिहिलं. यावरून सोनालीने सासरी गेल्यावर प्रथेनुसार आपलं नाव बदलल्याचं स्पष्ट झालं आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. वामिका नाव पाहून अनेकांनी हे दोघंही विराटचे फॅन असल्याच्या कमेंट्स देखील केल्या आहेत.

हेही वाचा : नाना पाटेकरांनी अंकशास्त्रावर विश्वास असलेल्या स्पर्धकाला विचारले असे प्रश्न, तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला; पाहा Video

अभिषेकची ( Abhishek Gaonkar ) पत्नी काय काम करते?

अभिषेक गावकरची बायको सोनाली गुरव ही सोशल मीडियावर विविध मजेशीर रील्स व्हिडीओ बनवत असते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तिच्या रील्सला मिलियनच्या घरात व्ह्यूज असतात. दोघेही अनेक वर्षांपासून एकत्र होते. आता अभिषेक ( Abhishek Gaonkar ) आणि सोनाली साता जन्माचे सोबती झाले आहेत.