Marathi Actor Abhishek Rahalkar Wedding : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. तर, काही सेलिब्रिटींनी प्रेमाची कबुली दिली आहे. अशातच मालिकाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याचा विवाहसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. अभिनेत्याच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला असून कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता अभिषेक रहाळकरने आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आधी गुपचूप साखरपुडा उरकल्यावर आता अभिषेकच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे. ‘दुर्गा’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुमानी खरेने हा Inside फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिषेकच्या साखरपुड्याचा फोटो सुद्धा रुमानी हिनेच इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
अभिषेक रहाळकर अडकला लग्नबंधनात
अभिषेकच्या ( Abhishek Rahalkar ) पत्नीचं नाव कृतिका असं आहे. अभिनेत्याने व त्याच्या पत्नीने लग्नसोहळ्यात पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. अभिषेकची पत्नी कृतिका गोल्डन रंगाची साडी, हातात हिरवा चुडा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
अभिषेकने लग्नाची घोषणा अद्याप सोशल मीडियावर केलेली नाही. रुमानी खरेने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केल्यामुळे ही आनंदाची बातमी सर्वांसमोर उघड झाली आहे. आता अभिनेता या सोहळ्यातील फोटो केव्हा शेअर करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय अभिज्ञा भावे, अभिषेकची मालिकेतील सहकलाकार दिव्या पुगावकर यांनीही अभिनेत्याला या नव्या प्रवासासाठी फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अभिषेक रहाळकरच्या ( Abhishek Rahalkar ) कामाबद्दल सांगायचं, झालं तर त्याने ‘स्टार प्रवाह’च्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारली होती. याशिवाय तो ‘झी मराठी’च्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत सुद्धा झळकला आहे.