‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील कायमच विविध धाटणीच्या मालिका प्रक्षेपित होत असतात. आता लवकरच ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या २० नोव्हेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतून अभिनेत्री ईशा केसकर ही पुन्हा पदार्पण करत आहे. तिच्याबरोबर अभिनेता अक्षर कोठारी ही या मालिकेत झळकणार आहे.

बंध रेशमाचे, छोटी मालकीण, स्वाभिमान या स्टार प्रवाहच्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता अक्षर कोठारी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत अक्षर हा अद्वैत चांदेकर ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या मालिकेत अद्वैत बिझनेस मॅनची व्यक्तिरेखा साकारणार आहे. वडिलोपार्जित चालत आलेला सोनं, चांदी आणि हिऱ्यांचा बिजनेस तो एकटा सांभाळतो. बिझनेसशी निगडित असलेली प्रत्येक गोष्ट तो खूप प्रामाणिकपणे करतो. तो जे पारखून घेईल, त्यात चूक शोधूनही सापडणार नाही, असं हे पात्र असणार आहे. त्याच्या पात्राचा एक प्रोमोही समोर आला आहे.
आणखी वाचा : “माझ्या या या अटी आहेत, तरच मी येईन, नाहीतर…”, मराठी कलाकारांच्या मागण्या पाहून प्रसिद्ध आयोजक संतापला

Neymar Makes Comeback For Al Hilal After Year Long Recovery
Neymar : नेयमारचं यशस्वी पुनरागमन; अल हिलालचा अल ऐनवर विजय
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
varun dhawan plays spy role for the first time in web series citadel honey bunny
गुप्तहेराच्या भूमिकेत वरुण धवन; ‘सिटाडेल’च्या भारतीय आवृत्तीची झलक प्रेक्षकांसमोर
Shraddha Kapoor unveils the Express Group Screen magazine
दिमाखदार कार्यक्रमात ‘स्क्रीन’ पुन्हा वाचकांच्या भेटीला
vaastav the reality sanjay narverkar sanjay dutt
‘वास्तव’ सिनेमाला २५ वर्षे पूर्ण! देड फुट्याची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला संजय दत्तचा किस्सा
fawad khan bollywood comeback
८ वर्षांनी ‘हा’ पाकिस्तानी अभिनेता करतोय बॉलीवूडमध्ये कमबॅक, नुकतीच एका सिनेमाच्या भारतातील प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी
Bigg Boss 18 nia sharma not going in salman khan show
Bigg Boss 18 : ग्रँड प्रिमियरच्या काही तासांआधी लोकप्रिय अभिनेत्रीने सलमान खानच्या शोला दिला नकार, पोस्ट करत म्हणाली, “मला दोष…”
compromise between the producers and the censor board regarding the release of the emergency film mumbai news
‘इमर्जन्सी’ चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार; निर्माते- सेन्सॉर मंडळातील तडजोडीनंतर प्रकरण उच्च न्यायालयाकडून निकाली

अद्वैत चांदेकर या व्यक्तिरेखेविषयी सांगताना अक्षर म्हणाला, “स्टार प्रवाहसोबत माझं जुनं नातं आहे. तसेच स्टार प्रवाह कुटुंबाचा भाग असल्याचा आनंद आहे. दिवाळीच्या धामधुमीत माझी लक्ष्मीच्या पाऊलांनी ही नवी मालिका भेटीला येत आहे. स्वाभिमान संपल्यानंतर नवीन काय अशी सातत्याने विचारणा होत होती. लक्ष्मीच्या पाऊलांनीच्या निमित्ताने नवं पात्र साकारायला मिळत आहे, याचा मला आनंद आहे.”

आणखी वाचा : “तेजस्विनी पंडित स्वाभिमानी, सोनाली कुलकर्णी उत्तम अभिनेत्री, तर सई ताम्हणकर…”; सिद्धार्थ जाधवचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

यावेळी त्याला ईशा केसकरबरोबर काम करण्याबद्दल विचारले असता त्याने प्रतिक्रिया दिली. “मी ईशा केसकरसोबत पहिल्यांदाच काम करतोय. भेटताक्षणीच आमची छान मैत्री झाली. याआधीच्या मालिकांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. हेच प्रेम नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे”, असे अक्षर कोठारी म्हणाला.