छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कायमच चर्चेत असतो. सध्या अभिनेता अक्षय केळकर हा बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीझोतात आहे. मराठी टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून अक्षय केळकरच्या लव्ह लाईफबद्दल विविध चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यासाठी पत्र पाठवले होते. हे पत्र वाचून तो भावूक झाला होता. त्यानंतर आता अक्षयने त्याची आणि त्याच्या गर्लफ्रेंडची पहिली ओळख कशी झाली, याबद्दल सांगितले आहे.

अक्षय केळकरने काही दिवसांपूर्वी तो आठ वर्षे एका मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याबद्दल सांगितले होते. त्यावेळी त्याने तिचे नाव रमा असल्याचेही सांगितले होते. हे तिचे टोपण नाव असून त्याला रमा माधव ही जोडी आवडत असल्याने त्याने ते ठेवले होते. यानंतर आता अक्षयने रमा आणि त्याची पहिली भेट कशी झाली याबद्दल खुलासा केला आहे.
आणखी वाचा : “आठ वर्षांचं प्रेम आहे माझं पण…” गर्लफ्रेंडचे पत्र वाचताच अक्षय केळकर ढसाढसा रडला

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
govinda wife sunita reveals actor hit two girls in college
“एका मुलीच्या तोंडावर गरम दूध फेकलं, तर दुसरीला…”, १८ व्या वर्षी सुनीताने केलेलं गोविंदाशी लग्न, ‘त्या’ प्रसंगानंतर झालेली पहिली भेट

“मी आणि रमा जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो ती गात होती. मी प्रेक्षक होतो. ती फार भारी गात होती. त्यावेळी मी ठरवलं होतं की लग्न करेन तर फक्त हिच्याशीच. मी त्यावेळी इंटरवलमध्ये तिला भेटायला गेलो, ती बाजूने गेली पण माझी बोलायची हिंमत झाली नाही. मग त्यानंतर मी फेसबुकला तिला मेसेज करायचो. हाय कशी आहे वैगरे असे अनेक मेसेज करायचो. पण त्यावर ती काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही. एकदा मी तिला मेसेज केला की तुझा जेव्हा काही कार्यक्रम असेल तेव्हा मला सांग? त्यावर ती हो असं म्हणाली.

त्यानंतर एक सप्ताह होता. तो सप्ताह माझ्या मित्राने आयोजित केला होता. मी सप्ताहला बसलो होतो. काही वेळाने मी मागे पाहिलं तर ती होती. त्यावेळी मी तिला विचारलं तू इथे कशी? त्यावर ती म्हणाली तू कसा इथे? त्यावर मी म्हणालो हे सर्व माझ्या मित्राने आयोजित केलेले आहे. त्यावर ती म्हणाले ते समोर जे गातात ते माझे बाबा आहेत. मग तू रोज सप्ताहला येणार का. त्यानंतर मी सात दिवस सप्ताह अटेंड केला. यानंतर मग आमचं बोलण सुरु झालं. फोन नंबर मिळाले. त्यावेळी ती आणि तिचा भाऊ एकच फोन वापरायचे”, असे अक्षयने सांगितले.

आणखी वाचा : “तुमने पुकारा और…” ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याबद्दल अभिजीत बिचुकलेचे संकेत

“मी तिला तिच्या वेळेला मेसेज करायचो. एकदा असचं मी तिला विचारले होते की तू मला आवडतोस. त्यावर ती म्हणाली हो का, फारच छान. त्यात एक दीड महिना गेला. त्यानंतर मी तिच्याशी बोलणं बंद केलं. मला ते खटकलं होतं. एक दिवस तिने मला विचारलं की तू बोलणं का टाकतोस, काय झालंय, त्यावर मी तिला स्पष्ट सांगितलं की मी तुला त्याच नजरेत बघितलं आहे. मैत्रीसाठी माझ्याकडे भरपूर पर्याय आहेत. अनेक मित्र-मैत्रिणी आहेत. यानंतरही तिने वेळ घेतला होता. तिने माझी चौकशीही केली होती. फेसबुकवरही फार सर्फिंग केलं होतं. यानंतर तिने मला विचारलं होतं की तू मला पुन्हा विचारणार आहेस का? त्यावर मी तिला अजिबात नाही, असे उत्तर दिले.

यानंतर तिने आपण भेटूया का, असे मला विचारले आणि आम्ही बस स्टॉपवर भेटलो. त्यावर मी तिला म्हटलं होतं की आपण पहिल्यांदा भेटतोय तर तू इतके गबाळे कपडे आणि केस अशी कशी येऊ शकतेस तू? तेव्हा ती म्हणाली मी महत्त्वाची आहे की आणखी काय? मला तू आवडतो, त्यावेळी मला तिचा हा स्पष्टपणा फार आवडला. आजही ती तशीच राहते. ती लिपस्टिक लावत नाही, पावडर नाही, मेकअप नाही, तिला साधंच राहायला आवडतं”, असेही अक्षय म्हणाला.

Story img Loader