बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून अक्षय केळकरला ओळखले जाते. या पर्वात त्याने विजेतेपद पटकावले. तो कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. आता अक्षय केळकरच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

अक्षय केळकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो, त्याची आई आणि बहिण असे तिघेजण दिसत आहेत. यावेळी त्यांच्या हातात काही बॅगाही पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओत त्याने घराचा फोटो टाकत “आम्हाला तुझी खूप आठवण येईल, पुन्हा एकदा, बाय कळवा घर” असे म्हटले आहे.
आणखी वाचा : “आता मात्र मी तिथे नसेन…”, अक्षय केळकरच्या ‘त्या’ पोस्टने चर्चांना उधाण, म्हणाला “माझ्या हातून इतकी वर्ष…”

या व्हिडीओला कॅप्शन देताना त्याने “घर आठवणी”, असे म्हणत एक इमोजी शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. यातील एका चाहत्याने “आता कुठे जाणार”, असे विचारले आहे. त्यावर त्याची बहीण श्रद्धाने “मुंबई” असे म्हटले आहे. तर एकाने त्यांना “तुम्ही कळव्याचं घर सोडलं का?” असे विचारले आहे. त्यावर श्रद्धाने “हो” असे म्हटले आहे.

akshay kelkar comment
अक्षय केळकरच्या बहिणीची कमेंट

आणखी वाचा : “तू पँट खराब केलीस, आता आई तुला मारणार…”, चाहतीच्या कमेंटवर अक्षय केळकरने दिले उत्तर, म्हणाला “माझी…”

दरम्यान अक्षय केळकरने काही महिन्यांपूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरासाठी अर्ज केला होता. अक्षय केळकरने पहाडी गोरेगाव आणि मागाठाणेमधील घरांसाठी एकूण तीन अर्ज भरले होते. त्यानंतर आता तो त्याच्या हक्काच्या घरात राहायला जात असल्याची माहिती समोर आली आहे.