छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कायमच चर्चेत असतो. सध्या अभिनेता अक्षय केळकर हा बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. मराठी टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षय केळकरच्या लव्ह लाइफबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. नुकतंच अक्षय केळकरच्या गर्लफ्रेंडबद्दलचा खुलासा झाला आहे.

बिग बॉस मराठी या कार्यक्रमात नुकतंच अभिनेता जितेंद्र जोशीने एंट्री घेतली होती. गोदावरी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जितेंद्र जोशी बिग बॉसच्या घरात गेला होता. त्यावेळी त्याने घरातील सदस्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे पत्र वाचून दाखवले. यावेळी त्याने अक्षय केळकरला त्याच्या गर्लफ्रेंडचे पत्र वाचून दाखवले.
आणखी वाचा : “तुमने पुकारा और…” ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याबद्दल अभिजीत बिचुकलेचे संकेत

Happy Diwali Wishes 2024 Wishes in Marathi
Diwali Wishes 2024 : प्रियजनांना द्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके मराठी मेसेज
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
zee marathi awards sharmishtha raut
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”
siddharth chandekar family visited star pravah mi honar superstar show
सिद्धार्थ चांदेकरला मिळालं गोड Surprise! शोमध्ये आई अन् पत्नीची उपस्थिती; त्याचे सावत्र वडील म्हणाले, “आम्ही सगळे…”
prithvik pratap and prajakta lovestory
प्रसाद खांडेकरच्या नाटकामुळे झालेली पहिली भेट अन्…; ‘अशी’ जमली पृथ्वीक प्रताप अन् प्राजक्ताची जोडी! खूपच हटके आहे लव्हस्टोरी

अक्षय केळकरच्या गर्लफ्रेंडच्या पत्रात काय?

“हाय हँडसम, खरतंर अजिबात तुला मिस यू वैगरे लिहिणार नव्हते. पण खूप जास्त मिस यू… एक महिना होऊन गेलाय आणि अजून तुझ्या नसण्याची सवय होत नाही. तुला तिकडे खूप चांगले आणि खरच खूप चांगले मित्र मैत्रिणी भेटले आहेत. पण आम्हाला अजूनही अक्षयला रिप्लेस करणारा कोणी सापडला नाही. आता आम्ही तुझे फालतू जोक पण मिस करतोय. या सगळ्यात एक गोष्ट भारी आहे ती म्हणजे २४ तास मला तुझ्यावर लक्ष ठेवता येतं. असं तुझ्यावर २४ तास नजर ठेवण्याचं माझं स्वप्न होतंच. त्यासाठी बिग बॉस मराठीचे खूप खूप आभार. तुला बिग बॉसच्या घरात पाहून खूप चांगलं वाटतंय. तू हसलास की मनापासून आनंद होतोय. तुला रडताना पाहून आमच्याही डोळ्यात पाणी येतं. तू खूप जास्त खरा आहेस आणि याचा आम्हाला अभिमान आहे. दसरा गेला, दिवाळी गेली, अरे आता इतकं केलंस आहेस तर नवीन वर्षही तिथेच सेलिब्रेट करुन ये.

मला माहितीये तिथे राहणं, टिकणं, लढणं अजिबात सोपं नाही. पण चिते की शिकार है, ये आसान नही होगी. तू मुळातच फायटर आहेस. तू सर्वच शून्यातून उभं केलंस. त्यामुळे माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू याही वेळी कमाल करुन दाखवशील. आम्ही एकमेकांची आणि डार्लिंग कारची काळजी घेतोय. घरात ट्रॉफीसाठी जागा ठरली आहे. आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान आहे. जिंकून ये…….(रमा)” असे त्याच्या गर्लफ्रेंडने त्या पत्रात म्हटले आहे.

अक्षय केळकरच्या गर्लफ्रेंडचे नाव रमा असे आहे. तिने या पत्रात स्वत:हून याबद्दलचा उल्लेख केला आहे. हे पत्र वाचल्यानंतर अक्षय केळकरने त्याच्या लव्ह लाईफबद्दलचा खुलासा केला आहे.

“आठ वर्षांचं प्रेम आहे माझं. खूप कठीण आहे हे पुढे. तिच्याही घरचे हे सर्व बघत असतील. ते पुढे जाऊन कठीण आहे. पण प्रेम आहे. मला शून्यापासून तिने बघितलंय आणि ती माझ्या घरच्यांना जास्त सांभाळते. मी त्यांच्याशी जास्त बोलत नाही. ती बोलते आणि हे टोपण नाव आहे रमा… माधव ही जोडी फार आवडते. त्यामुळे मी तिला रमा म्हणतो. मी खरं नाव घेतलं तर काहीही होणार नाही. माझी आठ वर्ष तिथेच थांबतील, असे अक्षयने सांगितले. त्यावेळी तो ढसाढसा रडला.

आणखी वाचा : “मी सध्या…” अपूर्वा नेमळेकरने सिंगल आहे का विचारणाऱ्याला दिलेले थेट उत्तर

यावर जितेंद्र जोशी म्हणाला, मी तुला शब्द देतो की तू असा खेळ की ते स्वत:हून तुझ्या घरी येतील. त्यावर अक्षय केळकरने आय लव्ह यू रमा, मी खरंच फक्त तुझा आहे, असे म्हटले. यावेळी अक्षयने त्याच्या गर्लफ्रेंडचे खरे नाव सांगितलेले नाही. तसेच ती नेमकी कोण आहे? ती काय करते? याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Story img Loader