अभिनेता अमेय वाघने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर अभिनेता कायम सक्रिय असतो. अमेय सध्या त्याच्या ‘असुर’ या वेब सीरिजमुळे चांगलाच चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Video : कार्तिक-कियाराने एकत्र गायलं रोमॅंटिक गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “यापुढे कधीच एकत्र गाणं…”

अमेय वाघने अलीकडेच ‘अमुक तमुक’ पॉडकास्टमध्ये हजेरी लावत आपले वैयक्तिक आयुष्य आणि त्याची सर्वात गाजलेली मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’बद्दल भाष्य केले आहे. अभिनेता म्हणाला, “कोणत्याही अभिनेत्याने प्रेक्षकांना रिलेट होणारी गोष्ट केली पाहिजे. आमच्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले कारण, आम्ही मित्र प्रेक्षकांना रिलेट झालो. त्यांना मालिका पाहताना हे आपलेच मित्र आहेत किंवा आपल्यातील एक भाग आहेत असे वाटले. एकंदर काय, तर आमच्या मालिकेने प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाशी रिलेट केले.”

हेही वाचा : “गणपती बाप्पा मोरया!” ‘बाईपण भारी देवा’च्या टीमने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, कलाकारांनी शेअर केले फोटो

अमेय पुढे म्हणाला, “काहीवेळा प्रेक्षक एखाद्या कलाकाराशी एवढे रिलेट करतात की, त्यांना वाटतं हा कॉमेडी करतोय म्हणजे खऱ्या आयुष्यात सुद्धा तो असाच असणार…असेच माझ्या बाबतीत अनेकदा घडते, माझ्या यापूर्वीच्या भूमिकांमुळे लोक माझ्याशी रिलेट करतात आणि स्वत: येऊन मैत्रीपूर्ण भावनेने बोलतात तेव्हा मला फार आनंद होतो.”

हेही वाचा : “रोमान्स, फॅमिली ड्रामा अन् ब्रेकअप…”, रणवीर-आलियाच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

दरम्यान, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका २०१५ मध्ये ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित व्हायची. प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे या मालिकेचा दुसरा भाग ‘दिल दोस्ती दोबारा’ २०१७ मध्ये सुरु करण्यात आला होता. मालिकेच्या दोन्ही भागांमध्ये अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पुष्कराज चिरपूटकर, पूजा ठोंबरे, स्वानंदी टिकेकर या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor amey wagh reveals why dil dosti duniyadari serial become popular sva 00
Show comments