सोनी मराठी वाहिनीवरील सर्वच मालिका कायमच चर्चेत असतात. या मालिकांमधील सर्वच पात्र हे कायमच प्रसिदधीझोतात असतात. आता सध्या सोनी मराठीवरील एका मालिकेची चर्चा सुरु आहे. या मालिकेत एक प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेता स्त्रीपात्र साकारणार आहे. नुकतंच याचा प्रोमोही समोर आला आहे.

सोनी मराठीवर लवकरच ‘प्रतिशोध – झुंज अस्तित्वाची…..’ ही नवी मालिका सुरु होणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत एक मुलगी आणि तिची आई सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात दागिने खरेदी करताना दिसत आहे. यावेळी ती मुलगी दागिने खरेदी करत असताना अचानक काही माणसं येऊन त्या बाईला गाडीत टाकून घेऊन जातात, असे या प्रोमोत पाहायला मिळत आहे. या मालिकेत एका स्त्रीपात्राची भूमिका पुरुष कलाकार साकारत आहे. अभिनेता अमोल बावडेकर हा या मालिकेत स्त्रीपात्र साकारताना दिसणार आहे. एका तरुण मुलीच्या आईचे पात्र अमोल रंगवणार आहे.  
आणखी वाचा : “हीच हास्यजत्रेची गंमत आहे…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकाराचा अप्रत्यक्ष टोला

Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Priyanka Chopra Praises Aaj Ki Raat song from stree 2
प्रियांका चोप्रा ‘स्त्री २’मधील ‘या’ गाण्याच्या प्रेमात; कलाकारांची स्तुती करीत म्हणाली, “तू एकदम छान, तो तर अगदी सोनं”
career journey of actor james earl jones
व्यक्तिवेध : जेम्स अर्ल जोन्स
Ishita Raj Confesses Love For Hardik Pandya in Interview After His Divorce with Wife
Hardik Pandya: ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री हार्दिक पंड्याच्या प्रेमात, कबुली देत म्हणाली, “माझं त्याच्यावर प्रेम आहे…”
shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट
Minu Muneer
Minu Muneer : “तो खोलीत आला आणि बेडवर खेचून…”, मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा सहकलाकारांवर गंभीर आरोप!
actress kangana ranaut praises indira gandhi during promotion of upcoming hindi film emergency
इंदिरा गांधींच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखं! अभिनेत्री दिग्दर्शक कंगना राणावतचे मत

अमोलने स्वत:च्या सोशल मीडियावरून या मालिकेचा फर्स्ट लूक चाहत्यांसाठी शेअर केला आहे. त्याचा हा लूक पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. काहींनी त्याच्या या लूकला चांगलीच पसंती दिली आहे. ही मालिका येत्या १६ जानेवारीपासून सुरु होणार आहे. रात्री १० वाजता ही मालिका प्रक्षेपित केली जाणार आहे.

आणखी वाचा : Video : उर्फी जावेद चक्क साडी नेसून पोहोचली विमानतळावर, वाऱ्यामुळे पदर सरकला अन्…

दरम्यान अमोल बावडेकरने आतापर्यंत चित्रपट, नाटक आणि मालिका सगळ्याच माध्यमात अनेक विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच त्याचा पांघरुण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. त्याच्या डोळ्यांमधली सात्विकता, त्याची शब्दफेक, भगवंताची भजनं गातानाची तल्लीनता ते सारं पाहताना आपल्याही चेहऱ्यावर प्रसन्न भाव उमटतात, अशी प्रतिक्रिया अनेक प्रेक्षक देताना पाहायला मिळाले.