‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दार उघडं बये’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील मुक्ता आणि सारंगच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेत रोशन विचारे, सानिया चौधरी, शरद पोंक्षे, किशोरी आंबिये या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले. या मालिकेतील अभिनेता अमोल नाईकने नुकतंच एक भावूक पोस्ट केली आहे.
दार उघडं बये या मालिकेत अमोल नाईकने सुनील हे पात्र साकारले होते. त्याच्या या पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. नुकतंच त्याने इन्स्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने मालिकेचे काही व्हिडीओ आणि फोटो कोलाज करुन शेअर केले आहेत.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”
अमोल नाईकची पोस्ट
“दार उघडं बये, दार उघड बये या मालिकेचा प्रवास परवा संपला. तुम्ही रसिक प्रेक्षकांनी या मालिकेवर खूप प्रेम केलं. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळेच या मालिकेने एक चांगला टप्पा ओलांडून तुम्हा सर्वांचे मनोरंजन केले.
मी trumpcardproduction आणि @zeemarathiofficial यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या मालिकेचा एक भाग बनण्याची संधी दिली. या मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली, सुरुवातीला काम करत असताना खूप दडपण होतं की एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत काम कसं होईल पण सगळे इतके छान की या फॅमिली मध्ये कधी रमलो ते कळालंच नाही.
दार उघड बये या मालिकेचा प्रवास जरी आता संपला असला तरी पुढे याच टीम सोबत नक्की परत दुसऱ्या एका मालिकेचे दार नक्की लवकर उघडेल आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी कायम मिळतचं राहील.
बाकी पुन्हा एकदा संपूर्ण दार उघड बये टीमचं मनापासून आभार खूप छान अनुभव तुमच्या सोबत काम करत असताना मिळाला आणि असेच पुढे परत एकत्र काम करतच राहू आणि भेटचं राहू.
Uno तर खूप मिस करतोय. पुन्हा भेटू लवकरच….”, असे अमोल नाईकने म्हटले आहे.
आणखी वाचा : “घर घेतलं, पण इंटेरिअरसाठी पैसे नाहीत”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री व्यक्त केलं दु:ख, म्हणाली “माझा नवरा…”
दरम्यान अमोल नाईकच्या या पोस्टवर मालिकेतील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टवर मालिकेतील कलाकार हार्ट इमोजी शेअर करत कमेंट करताना दिसत आहेत. सध्या त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.