आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता अंशुमन विचारे नेहमी चर्चेत असतो. ‘फूबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या अंशुमनने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर तो खूप सक्रिय असतो. आपल्या कुटुंबाबरोबरचे व्हिडीओ सतत शेअर करत असतो. त्याची पत्नी पल्लवी विचारे देखील मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे विचारे कुटुंब नेहमी चर्चेत असतं. जेव्हा या विचारे कुटुंबाला लांबच्या प्रवासाचा कंटाळा येतो तेव्हा ते काय करतं? जाणून घ्या…

हेही वाचा – “एका सावरकर भक्तासाठी…”, मुग्धा वैशंपायनची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटावर प्रतिक्रिया, म्हणाली…

अंशुमनने काही तासांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत, विचारे कुटुंब प्रवास करताना दिसत आहे. यात अंशुमन गाडी चालवत असून त्याच्या शेजारी पत्नी आणि मागे लाडकी अन्वी पाहायला मिळत आहे. लांबच्या प्रवासाचा कंटाळा आल्यामुळे विचारे कुटुंबाने गाडीतच मैफील बसवली आहे. यामध्ये पल्लवी गात असून त्याला अंशुमनने तोंडाने म्युझिकची साथ दिली आहे. तर मागे अन्वी नाचताना दिसत आहे. विचारे कुटुंबाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “तुमचं कुटुंब खूप मस्त आहे दादा”, “दादाचं बॅक ग्राउंड म्युझिक एकनंबर”, “ताई तुमचा आवाज खूप गोड आहे आणि अन्वी डान्स खूप छान”, “अन्वीचा कॉमेडी डान्स बघून हसायला येतंय”, अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – शशांक केतकरच्या ‘मुरांबा’ मालिकेत आशय कुलकर्णी झळकणार ‘या’ भूमिकेत, पाहा व्हिडीओ

दरम्यान, अंशुमनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, विनोदी कार्यक्रमा व्यतिरिक्त त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनयाबरोबरच अंशुमन उत्तम गायक देखील आहे. ‘सिंगिंग स्टार’ या कार्यक्रमात तो झळकला होता. सध्या त्याचं रंगभूमीवर ‘राजू बन गया zentalman’ हे विनोदी नाटक सुरू आहे. या नाटकात अंशुमनसह उमेश जगताप, अमृता फडके, विनम्र भाबल, संदीप कांबळे, नरेंद्र केरेकर पाहायला मिळत आहेत.

Story img Loader