अशोक सराफ आणि किशोरी शहाणे यांचं “तुझी माझी जोडी जमली गं” हे एव्हरग्रीन गाणं आजही तरुणाईत लोकप्रिय आहे. ‘माझा पती करोडपती’ या १९८८ रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील हे गाणं किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलं आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज ३५ वर्ष पूर्ण झाली तरीही या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अलीकडेच मराठी अभिनेता अंशुमन विचारेने बायको पल्लवी विचारेसह “तुझी माझी जोडी जमली गं” हे जुनं गाणं रिक्रिएट केलं. अभिनेत्याने पत्नीबरोबर केलेल्या या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत अंशुमनने किशोरी शहाणे, सचिन पिळगावकर आणि निवेदिता सराफ यांना टॅग केलं आहे.

हेही वाचा : “या मूर्ख कलाकारांबरोबर…”, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींची बॉलीवूडवर टीका; म्हणाले, “मी मानसिक निवृत्ती…”

अभिनेत्याने या व्हिडीओला “पहिल्यांदाच मी आणि बायको…थोडीशी गंमत…आयुष्यभर ज्या गाण्यांवर आणि ज्या पिढीवर प्रेम करत आलो त्यांची जागा दुसरं कुणीच आणि कधीच घेऊ शकत नाही.” असं कॅप्शन दिलं आहे. या गाण्याच्या शूटिंगसाठी त्याने बायकोसह रेट्रो लूक केला होता.

हेही वाचा : ‘KBC’मध्ये स्पर्धकाला २५ लाखांसाठी विचारला गेला ‘जंगल बुक’वर आधारित ‘हा’ प्रश्न, लाईफलाईन वापरूनही आलं नाही उत्तर, अखेर सोडावा लागला शो

अभिनेत्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स करत या जोडप्याचं कौतुक केलं आहे. “लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात याची साक्ष”, “अंशु तू काहीही बनव.. आमचे लाईक असणारच…”, “लय भारी दादा” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. तसेच अंकुश चौधरी, नम्रता संभेराव या कलाकारांनी सुद्धा कमेंट करत अंशुमन आणि त्याच्या बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत.