‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चं नवं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. या नव्या पर्वाची गुरुकुल ही थीम प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. गायक, संगीतकार, दिग्दर्शक सलील कुलकर्णी आणि गायिका वैशाली माडे उत्तमरित्या परीक्षकाची भूमिका सांभाळत आहेत. तर या संपूर्ण गुरुकुलची जबाबदारी सुरेश वाडकर सांभाळत आहेत. लवकरच या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हजेरी लावणार आहे. याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video: हॉलीवूड अभिनेत्रीबरोबरच्या ‘त्या’ कृतीमुळे रणबीर कपूर ट्रोल; नेटकरी म्हणाले, “आरकेनं संधी साधली”

‘झी मराठी’च्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री आणि ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ची सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडे अशोक सराफ यांना विचारते की, ‘कोणती अभिनेत्री तयार व्हायला सर्वात जास्त वेळ लावते?’ यावर अशोक सराफ त्यांच्याजवळ असलेल्या सर्व अभिनेत्रींचे फोटो दाखवतात.

हेही वाचा – “मला आत्महत्या करावीशी वाटत होती”, लोकप्रिय अभिनेत्रीने मांडली व्यथा, म्हणाली, “माझी…”

अशोक सराफ यांनी दाखवलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री रिमा लागू, अश्विनी भावे, किशोरी शहाणे पाहायला मिळत आहे. या उत्तरानंतर मृण्मयी म्हणते की, ‘तुमचा केवढा त्रासलेल्या चेहरा आहे?’ यावर अशोक सराफ म्हणतात की, “काय करणार… तयार होण्यासाठी वेळ न लावणारी नटी अजून जन्माला यायची आहे.”

हेही वाचा – “डान्स करणं हा माझ्यासाठी फोबिया होता पण…”, ऐश्वर्या नारकर यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाल्या,”हे त्या लोकांसाठी…”

हेही वाचा – लक्ष्मीकांत बेर्डे यांचं आवडतं पुस्तक, नाटक अन् बरंच काही; ‘हा’ जुना व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, “लक्ष्या मामा….”

दरम्यान, गेल्या आठवड्यात ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ मंचावर अक्षरा आणि अधिपतीची हळद, लग्न वगैरे पाहायला मिळाल होतं. आता येत्या भागामध्ये अशोक सराफ यांच्याबरोबरची धमाल-मस्ती पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor ashok saraf will participate in sa re ga ma pa little champs upcoming episode pps