‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यापैकी एक म्हणजे भाऊ कदम. गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या विनोदी शैलीने भाऊ कदम महाराष्ट्राला खळखळून हसवत आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाबरोबर त्यांच्यातील असलेल्या साधेपणाने लोकांची मनं जिंकली आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याचा सध्या एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
हेही वाचा – तत्त्वज्ञानात पदवी, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव ते चुंबनदृश्यांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री
‘झी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर भाऊ कदम यांचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ते अभिनेते अशोक शिंदे यांचा चाहता बनून त्यांना डाएट विषयी विचारताना दिसत आहेत. त्यानंतर अशोक शिंदे त्यांचं डाएट सांगतात. ते म्हणतात की, “साखर बंद करायची. अजिबात साखर खायची नाही. साखरेचा चहा नाही, गोड खायचं नाही. सगळे पदार्थ उकडलेले म्हणजे सगळ्या भाज्या पाण्यात उकडवून खायच्या. चपाती, भात बंद करायचा. एवढं करून एक तास स्वतःसाठी व्यायामाला द्यायचा.” हे सर्व ऐकून भाऊ कदम त्यांचा एक निर्णय बदलतात. तो कोणता? ते व्हिडीओमध्ये पाहा.
हेही वाचा – Video: बायकोबरोबर भांडणं झाल्यावर काय करायचं? अविनाश नारकरांनी समस्त नवऱ्यांना दिला मोलाचा सल्ला, म्हणाले…
हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानने शुभांगी गोखलेंची केली नक्कल; पाहा व्हिडीओ
दरम्यान, भाऊ कदम यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, ते सध्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ‘करून गेलो गाव’ हे नाटक त्यांचं रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या नाटकात त्यांच्याबरोबर ओंकार भोजने काम करत आहे.