मराठी सिनेसृष्टीतील ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते, जे नेहमी चर्चेत असतात ते म्हणजे अभिनेते अविनाश नारकर. आपल्या उत्कृष्ट कामाबरोबरच अविनाश नारकर सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे सतत चर्चेचा विषय असतात. त्यांचे मजेशीर व्हिडीओ, डान्स व्हिडीओ व्हायरल होतं असतात. पन्नाशीतही त्यांची ही एनर्जी, तारुण्य हे तरुणाईला लाजेवलं असं आहे. नुकताच त्यांनी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. ज्यावर एका नेटकऱ्याने असभ्य भाषेत प्रतिक्रिया केली; ज्याला अविनाश नारकरांनी सडेतोड उत्तर दिलं.

“सुट्ट्या सुरू आहेत…मस्त फिरून या…बिना पैस…”, असं कॅप्शन देत अविनाश नारकर यांनी मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओतून त्यांनी पैशांशिवाय कसं फिरायचं हे मजेशीर अंदाजात दाखवलं होतं. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. २६ हजारांहून अधिक व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले असून त्यांच्या चाहत्यांच्या हसण्याच्या इमोजींचा पाऊस प्रतिक्रियेत पडला. पण एका नेटकऱ्याने असभ्य भाषेत प्रतिक्रिया दिली; जी वाचून अभिनेते अविनाश नारकर संतापले आणि त्यांनी नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलं.

हेही वाचा- बाबाला केलं किस, तर कधी कॅमेराला पाहून हसली; राहाच्या गोड अंदाजाने वेधलं लक्ष, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगहून परतले रणबीर-आलिया

हेही वाचा – अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये शाहरुख खानची ‘तेरे नाम’मधील राधेसारखी हेअरस्टाइल, रणबीर कपूरबरोबरचा ‘तो’ फोटो व्हायरल

त्या नेटकऱ्याने अविनाश नारकरांच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत लिहिलं होतं, “अरे भिकारड्यांनो पुण्यात दोन तरुण मुलं धनदांडग्यांच्या हरामखोर पोराने ठार मारली गाडीखाली चिरडून. ****सारखे नाचतांना आधी थोड खेद, दुःख राग व्यक्त करा. षंढासारखे नुसते भिऊन नाचता काय थेरड्यांना?” या प्रतिक्रियेचं उत्तर त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर दिलं आहे. अविनाश नारकर त्या नेटकऱ्याला उत्तर देत म्हणाले, “तुम्ही बोलण्यातली सभ्यता किमान जपा.”

हेही वाचा – ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम अभिनेता झाला बाबा, आनंदाची बातमी देत म्हणाला, “आमच्या लाडक्या…”

हेही वाचा – ‘जाने तू या जाने ना’ फेम इमरान खानने डोंगराळ भागात पारंपरिक गावरान पद्धतीनं बांधलं घर, पाहा Inside फोटो

दरम्यान, अविनाश नारकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांच्या लोकप्रिय ‘कन्यादान’ मालिकेने अलीकडे प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘सन मराठी’ वाहिनीवरील या मालिकेत त्यांनी वडिलांची भूमिका साकारली होती. बऱ्याच काळ अविनाश यांच्या ‘कन्यादान’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. याआधी अविनाश नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘३६ गुणी जोडी’ मालिकेत झळकले होते.