‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे सध्या या मालिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. बुधवारी (८ नोव्हेंबर) मालिकेचे शेवटचे शूटिंग पार पडले. म्हणून मालिकेतील कलाकार आतापर्यंतच्या प्रवासाविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. अशातच मालिकेतील एका अभिनेत्रीचा व्हिडीओ चर्चेत आला आहे; ज्यामध्ये ही अभिनेत्री दिवाळीनिमित्ताने कणकेचे दिवे बनवताना दिसत आहे.
हेही वाचा – मलायका अरोराने लेकाचा २१वा वाढदिवस ‘असा’ केला साजरा; म्हणाली, “तुझी आई कायम…”
‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील ही अभिनेत्री म्हणजे सारिका नवाथे. काही तासांपूर्वी तिने कणकेचे दिवे बनवताचा व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला आणि लिहीलं, “रील्स पाहत असताना हे क्यूट गुलाबा सारखे कणकेचे दिवे कसे करायचे ते पहिले .. म्हटलं चला आपण पण करून बघू .. केले आणि छान वाटलं .. माझ्या या छोट्याशा आनंदात तुम्ही पण सहभागी व्हा … कणकेचा दिवा इतर दिव्यांच्या तुलनेत अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो. अंधकारावर प्रकाशाचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. अंधार हा कितीही गडद असला तरी प्रकाशाची एक किरण त्याला भेदू शकते…अंधाराचा नाश करू शकते… तुम्ही काय स्पेशल करताय यावर्षी? रांगोळी? फराळ? सजावट? जे काही नवीन शिकला असाल, करत असाल नक्की शेअर करा.”
सारिकाने केलेले हे गुलाबासारखे कणकेचे दिवे पाहून अभिनेते अविनाश नारकर चकीत झाले. त्यांनी तिच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत लिहीलं की, व्वा व्वा व्वा व्वा व्वा… सारिका…. क्या बात है…!!❤️ अविनाश नारकरांच्या या प्रतिक्रियेवर सारिका मजेशीर अंदाजात म्हणाली, “हो आपण सतत दिवे लावत राहायचे. शुभ दीपावली.”
हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील लहानग्या कार्तिकीने केल्या चकल्या, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
दरम्यान, अभिनेत्री सारिका नवाथेने ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत बाबी आत्याची भूमिका साकारली आहे. या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.