‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर २ डिसेंबरपासून नवीन मालिका सुरू झाली आहे. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि मंगेश कदम प्रमुख भूमिकेत झळकले आहेत. तसंच या नव्या मालिकेत हरीश दुधाडे, प्रतिक्षा जाधव, अदिश वैद्य, पल्लवी कदम असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेनिमित्ताने लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकर १५ वर्षांनंतर ‘स्टार प्रवाह’साठी काम करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता चिन्मय मांडलेकर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या नव्या मालिकेत अभिनेता म्हणून नाही तर लेखकाची धुरा सांभाळत आहे. २ डिसेंबरपासून ही नवी मालिका दुपारी २.३० वाजता प्रसारित होतं आहे. त्यानिमित्ताने नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. यावेळी चिन्मय मांडलेकरने निवेदिता सराफ यांच्या कामाबद्दल भरभरून कौतुक करत एक खंत व्यक्त केली. तो नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या…

हेही वाचा – Video: दुआ लिपा लाइव्ह कॉन्सर्टमध्ये शाहरुख खानच्या गाण्यावर का थिरकली? कारण सांगत म्हणाली…

हेही वाचा – Video: आळंदीचा चैतन्य देवढे गाजवतोय ‘इंडियन आयडल’चं १५वं पर्व, नाना पाटेकरांनी त्याची ‘ही’ कृती पाहून जोडले हात, पाहा व्हिडीओ

चिन्मय मांडलेकर म्हणाला की, निवेदिता ताईंच्या एनर्जीला हॅट्स ऑफ आहे. मला असं वाटतं, जितकं आपण या अभिनेत्रीला सेलिब्रेट केलं पाहिजे तितकं आपण करत नाही. कारण मी त्यांच्याबरोबर नाटकात काम केलं आहे. त्यामुळे त्या कसं काम करतात हे मी जवळून पाहिलंय. आताही इथे शूटिंग करतायत त्याच वेळेला त्या निर्मात्या म्हणून मालिका करतायत त्यातही त्यांचं १०० टक्के लक्ष आहे. एवढं मल्टीटास्किंग करून सगळीकडे खूप चांगलं डिलिव्हर करणं हे काम सोपं नाहीये. त्याच्याबरोबरीने त्या इतर अ‍ॅक्टिव्हिटी करत असतात. मी त्यांचा शेजारी आहे म्हणून मला माहित आहे. पण खरंच या बाईच्या एनर्जीला हॅट्स ऑफ.”

हेही वाचा – Bigg Boss 18: नवव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये शिवीगाळ अन् विश्वासघात, ‘हे’ सहा सदस्य झाले घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट

दरम्यान, चिन्मय मांडलेकरने बऱ्याच मराठी मालिकांसाठी लेखक म्हणून काम केलं आहे. ‘असंभव’, ‘वादळवाट’, ‘तू तिथे मी’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘जीव झाला येडापिसा’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘तू माझा सांगाती’, ‘राजा राणीची गं जोडी’, ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकांसाठी कथा आणि पटकथा लेखणाचं काम चिन्मयने केलं आहे. आता तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील नवी मालिका ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या नव्या मालिकेच्या लेखणाची जबाबादारी पार पाडत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor chinmay mandlekar praise of nivedita saraf pps