‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. ओंकार हा कायमच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून ओंकार भोजने हा ‘करुन गेलो गाव’ या नाटकात काम करताना दिसत आहे. नुकतंच या नाटकातील एक व्हिडीओ समोर आला आहे.

ओंकार भोजनेचा नाटकादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तो त्यानेच गायलेली एक कविता सादर करताना दिसत आहे. ‘तू दूर का…’ असे या कवितेचे बोल आहेत. ओंकारची कविता सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याची ही कविता नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.
आणखी वाचा : “मला हास्यजत्रेत…” ओंकार भोजनेने ‘फू बाई फू’ कार्यक्रमात जाण्याबद्दल दिले स्पष्टीकरण

ओंकार भोजनेची कविता

“तू दूर का…
अशी तू दूर का…
मी असा मजबूर का…
मनाला मनाची खरी ओढ राही
अलबेल सारे तरी गोड नाही
पाहण्या तुला मन हे आतुर का…
तू दूर का…
अशी तू दूर का…
मी असा मजबूर का…
मी असा मजबूर का…”

आणखी वाचा : “‘बाई, बूब्स आणि ब्रा’ पोस्टनंतर मला एका लग्न झालेल्या पुरुषाने फोन केला अन्…” हेमांगी कवीने सांगितला ‘तो’ किस्सा

दरम्यान ओंकार भोजनेला कविता करण्याची फार आवड आहे. काही महिन्यांपूर्वी ओंकार भोजनेची प्रमुख भूमिका असलेला सरला एक कोटी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर आता लवकरच तो कलावती नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. ओंकारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडल्यानंतर त्याच्यावर अनेक प्रेक्षक नाराज झाले होते. त्याने या कार्यक्रमाला रामराम करत झी मराठी वाहिनीवरील ‘फु बाई फु’ कार्यक्रमात एण्ट्री केली. मात्र हा कार्यक्रमही फार काळ चालला नाही.

Story img Loader