‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत दौलत या नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत अभिनेता हृषिकेश शेलार(Hrishikesh Shelar)ने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सध्या हा अभिनेता अधिपती या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. त्याबरोबरच अभिनेता शिकायला गेलो एक या नाटकातूनसुद्धा तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता हृषिकेश शेलारने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने भाऊ कदम, विशाखा सुभेदार, प्रियदर्शन जाधव या कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

काय म्हणाला अभिनेता?

अभिनेता हृषिकेश शेलारने नुकतीच ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या अभिनयाचा प्रवास कसा झाला ते स्पष्ट केले. हृषिकेशने म्हटले, ” २००९ ला ‘क्राइम डायरी’मध्ये पहिल्यांदा टेलिव्हिजनवर काम केलं होतं. एका दिवसाचे ३०० रुपये मिळाले होते. तेव्हा मिरजेमध्ये शूटिंग करायचो. अशी छोटी-मोठी काम करणं सुरू होतं. त्यादरम्यान विजय केंकरेंचा फोन आला. विजय केंकरेंनी अकादमीमध्ये असताना आमचं एक नाटक बसवलं होतं. शेक्सपियरचं द कॉमेडी ऑफ एरर्स हे हिंदीमध्ये दो और दो पाँच, असं नाटक होतं. तर त्या नाटकामध्ये मी मुख्य भूमिकेत होतो. त्यात दुहेरी भूमिका होती. त्यावर अँगूर नावाचा चित्रपट आला. विजय केंकरे शांतेचं कार्ट हे नाटक रिओपन करत होते. त्यांनी मला फोन केला आणि नाटकात काम करणार का? म्हणून विचारलं. मी होकार दिला. त्यांनी मला सांगितलं की, भूमिका काही तुझ्या तोडीची नाही. छोटीशी भूमिका आहे; पण व्यावसायिक नाटकाच्या निमित्तानं तू मुंबईत येशील, प्रोसेसमध्ये राहशील आणि पैसे सुटत राहतील. उद्यापासून रीडिंगला ये, असं त्यांनी मला सांगितलं. त्यावेळी मी गोरेगावला होतो. शांतेचं कार्ट या नाटकात माझी पाच मिनिटांची छोटीशी इन्स्पेक्टरची भूमिका असायची. ‘शांतेचं कार्ट’मध्ये भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार अशी रथी-महारथी मंडळी होती. या लोकांना बघून मी खूप शिकलो.”

Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Who is Sadhvi Harsha Richariya
Who is Beautiful Sadhvi: महाकुंभमध्ये साध्वी म्हणून मिरवणारी हर्षा रिचारिया कोण आहे? जुने रिल व्हायरल करुन केलं जातंय ट्रोल
He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

“प्रियदर्शन जाधव व विशाखा सुभेदार यांची जुगलबंदी असायची. त्यामध्ये प्रियदर्शन जाधव ज्या एनर्जीने सीन करायचा, तो चौकार-षटकार असायचा. एक पत्रवाचनाचा एक सीन असायचा. पण, त्याला विशाखा सुभेदार ज्या पद्धतीने रिअॅक्ट व्हायच्या, मग तो लाफ्टरचा बंपर यायचा. तर ते वजा केलं ना, काहीच नाही. दर्शनदादासाठीसुद्धा ते शिवधनुष्य होतं. कारण- लक्ष्मीकांत बेर्डेंनी शांतेचं कार्ट करून ठेवलं होतं. एवढं मोठं नाव, त्यानंतर पुन्हा एकदा हात घालतो म्हटल्यावर एक बर्डन होतं. पण, तो माणूस ज्या पद्धतीनं त्या नाटकाला भिडला होता ना, माझ्या नकळतपणे त्याचा एक अ‍ॅटिट्यूड माझ्यात झिरपत गेला. कारण- मी त्याच्याबरोबर असायचो. एक तर सांगली-कोल्हापूर असल्यामुळे ते एक कनेक्शन असतं. त्याशिवाय मी शफीसरांचा विद्यार्थी, त्यानंही शफीसरांची अनेक नाटकं केली आहेत आणि तोसुद्धा शफीसरांना मानतो. तो एक आमचा समान दुवा होता. तर, त्या लोकांना बघून मी खूप शिकलो. “

हेही वाचा: ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा

“‘शांतेचं कार्ट’ करताना त्याचा दृष्टिकोन निर्भीड होता. कारण- टीका करणारे लोक खूप होते. लक्ष्मीकांत बेर्डेने कुठच्या काय करून ठेवलेलं, हा कोण नवीन आम्हाला शिकवणारा, अशा टीका होणारच होत्या. हे सगळं बाजूला करून स्वत:च्या स्टाईलनं तो रोल ज्या पद्धतीने घेऊन जायचा, मजेदार, बहारदार करायचा. अर्थात, विशाखा सुभेदार, भाऊ कदम ही सगळीच मंडळी होती”, असे म्हणत अभिनयाच्या प्रवासात या सर्वांकडून खूप शिकलो, असे हृषिकेश शेलारने म्हटले आहे.

Story img Loader