‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ शोची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे. या शोच्या या तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे. या शोच्या आधीच्या दोन सीझनलाही प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळाला होता. आताही या शोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’च्या आगामी भागात अभिनेता जितेंद्र जोशी हजेरी लावणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच झी मराठीने इन्स्टाग्रामवर आगामी भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे. यात अवधूत गुप्ते हा जितेंद्र जोशीचे स्वागत करताना दिसत आहे. यानंतर ते दोघेही एकत्र गाणं गाताना दिसतात. यावेळी अवधूत गुप्ते हा जितेंद्र जोशीला विविध प्रश्न विचारताना दिसत आहे.
आणखी वाचा : “फक्त त्या मुलींना का बोलता?” मानसी नाईकचा लावणी कार्यक्रम घेणाऱ्यांवर संताप, म्हणाली “तुम्ही नेते…”

यावेळी अवधूत गुप्ते हा जितेंद्र जोशीला “आवडता दिग्दर्शक नागराज मंजुळे की निखिल महाजन” असा प्रश्न विचारतो. त्यावर जितेंद्र जोशी हा अवधूतला “तुझा आवडता अभिनेता कोण संतोष जुवेकर की जितेंद्र जोशी”, असं विचारतो. त्यानंतर अवधूत गुप्ते हा रागात कार्यक्रम माझा आहे, असे म्हणतो.

त्यावर जितेंद्र जोशीने “नाही नाही मला बोलू दे”, असे म्हणत असतो. त्याचवेळी अवधूत गुप्ते “हा ही खुर्ची प्रश्न विचारण्याची आहे”, असे बोलतो. त्यावर जितेंद्र जोशीने “आम्ही इथे बसलेलो असतो, आम्हाला उत आलाय का?” असे म्हटले.

आणखी वाचा : “आता मी तुझं लग्न लावतोय…”, सिद्धार्थ चांदेकरची आई पुन्हा विवाहबंधनात, फोटो आला समोर

या कार्यक्रमातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’चा हा भाग तुम्हाला ‘झी मराठी’ चॅनल तसेच ‘झी ५’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor jitendra joshi angry avdhoot gupte khupte tithe gupte programme watch video nrp
First published on: 23-08-2023 at 16:24 IST