मराठी चित्रपटातील विनोदाचा सम्राट अशी ओळख कमावलेले अभिनेता, दिग्दर्शक म्हणजे दादा कोंडके. त्यांनी मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर हिंदी कलाकारांच्या मनावरही राज्य केलं आहे. दादा कोंडके यांचा चित्रपट प्रदर्शित होणार म्हटलं की बॉलिवूडमधील अनेक निर्मात्यांना धडकी भरायची. दादा कोंडके यांची येत्या ८ ऑगस्टला ९१ वी जयंती होती. त्यानिमित्ताने झी टॉकीजवर “ज्युबिली स्टार दादा” या अंतर्गत ६ सुपरहिट चित्रपट दाखवले जाणार आहे. नुकतंच अभिनेते किरण माने यांनी या निमित्तान एक पोस्ट शेअर केली ाहे.

किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी दादांविषयी बोलताना अनेकांच्या तोंडून ‘अश्लील चित्रपट’, ‘डबल मिनिंग संवाद’ हे शब्द ऐकायला मिळतात. मात्र या सर्वांपलीकडेही सामाजिक भान जपणाऱ्या, राजकीय परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या अभिनेत्याला आपण ओळखलंच नाही, अशा आशयाची पोस्ट किरण माने यांनी केली आहे.
आणखी वाचा : Video : रोमँटिक प्रपोज, किस अन्…; अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात, ख्रिश्चन पद्धतीने पार पडला सोहळा

mother expressed grief, child orphanage,
आई म्हणून मीच एकटी दोषी का रे!
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
How much power does Noel Tata head of Tata Trusts have What are the challenges
नोएल टाटा आता टाटा न्यासांचे प्रमुख… त्यांच्याकडे किती अधिकार? आव्हाने कोणती?
Nilima Sheikh Kashmir paintings
कलाकारण: काश्मीरची पिछवाई…
Amitabh Bachhan Post about Ratan Tata
Ratan Tata : “एका युगाचा अंत झाला, अफाट दूरदृष्टी…”; रतन टाटांबाबत अभिनेते अमिताभ बच्चन यांची पोस्ट
Nitin Gadkari, patodi, Nagpur, patodi sellers,
गडकरींचे खाद्य प्रेम अन् पाटोडी विक्रेत्यांची सोय
Krystle D'Souza's 60-Hour Non-Stop Shoot: Impact on the Body
अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाने केले होते ६० तास नॉन-स्टॉप शूट! विश्रांती न घेता काम केल्याने शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
tanishq
नैसर्गिक हिऱ्यांना कृत्रिम पर्याय नाही; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायणन यांची माहिती

किरण माने यांची पोस्ट

“साला तुम लोगने वो तुकारामको उपर पाठव्या… तुमने साला वो मिराबाईको जहर पिलाया… संत ज्ञानेश्वरको तुम लोगोंने गाड दिया… तुम लोग सिर्फ डाकू लोगकोच पसंद करता हय.” दादा कोंडकेंच्या ‘राम राम गंगाराम’ मधला म्हमद्या खाटिक बोलून जातो…

असलं जळजळीत परखड सत्य आपल्या अनेक सिनेमांंमधनं सांगनार्‍या दादांना ‘अश्लील’ म्हणून का हिनवलं गेलं हे मला आजपर्यन्त कळलेलं नाय दोस्तांनो ! स्पष्टच बोलू का? दादा कोंडके म्हन्लं की ज्यांना फक्त ‘डबल मिनिंग’चे संवाद आठवत्यात त्यांना दादा कळलेच न्हाईत !

…श्रेष्ठ कलावंत तोच असतो भावांनो, जो मनोरंजन करता-करता समाजाच्या खर्‍या वेदनांना वाचा फोडतो… जनजागृतीची, समाजसुधारणेची जबाबदारी खांद्यावर घेतो. जातीधर्मापलीकडची ‘मानवता’ जपतो. त्या कलाकारालाच सर्वसामान्य प्रेक्षक मनापास्नं भरभरून प्रेम देतात… जसं दादांना दिलं !

दादांनी आपल्या पिच्चरमधनं बिनधास्तपने सामाजिक-राजकीय भाष्य केलं… त्या काळातल्या इंदिरा गांधी-संजय गांधींच्या धोरनांवर, आनीबानीमधल्या अराजकावर सडकून आन् बेधडक टीका केली. गायवासरू हे काॅंग्रेसचं निवडणूक चिन्ह होतं. त्याकाळात नोटा खाणारं वासरू आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणारी गाय हे दाखवणं लै खतरनाक होतं गड्याहो.

…’राम राम गंगाराम’मधला म्हमद्या खाटीक आनि गंगारामची मैत्री ही नुस्ती मनोरंजनासाठी नव्हती.. त्यात हिंदू-मुस्लीम एकतेचा सामाजिक संदेशबी व्हता ! “मटनाच्या दुकानात भगवान शंकराच्या फोटोपुढं नमाज पडणारा म्हमद्या… ते पाहून ‘भावना दुखावून’ चिडनारे (मटन आनायला आलेले) गुरूजी… हे समदं लै लै लै खोल व्हतं भावांनो !

‘ह्योच नवरा पायजे’ मधला “गाॅड इज वन.. पन नेम्स आर अनेक.” असं म्हनत फादरनं दिलेला क्राॅस आनंदानं गळ्यात घालनारे आनि त्याचवेळी चाॅंदभाईनं दिलेला ताईत दंडाला बांधनारे दादा ज्याला कळले.. तो दादांना कधीच ‘फक्त’ डबल मिनिंगमध्ये अडकवून चीप करनार नाय !

याच सिनेमातला एक प्रसंग तर लै लै लै खतरनाक हाय.. ‘जाॅन बेकरी’ मध्ये गेलेल्या दादा कोंडकेंना, तिथं पाव आणायला आलेला एक म्हातारा अडवतो आणि म्हणतो “काय रे शिंच्याS? हिंदू असुन गळ्यात क्राॅस घातलायस? एकादशीच्या मुहूर्तावर खिश्चन झालास की काSय?” त्यावर दादा त्याला सुनावतात, “तुम्ही काय केलंय हो धर्मासाठी? हा बेकरीवाला जनू कांबळे.. हरीजन म्हनून तुम्ही वाळीत टाकला. अस्पृश्य म्हनून हिनवला. गावाबाहेर काढला. त्या फादरनं त्याला जवळ केला. जनू कांबळेचा ‘जाॅन कॅंबल’ केला..त्याला बेकरी टाकून दिली. आता त्या बेकरीतून तुम्ही पाव विकत घेताय..तुमाला लाज वाटत नाय??? यू बेशरम..तुला जोड्यानंच मारला पायजे,” म्हनत खाडदिशी त्याच्या मुस्काडात देनारे दादा.. आनि घाबरून गळून जानारा तो म्हातारा… आनि त्यावर कळस म्हन्जे त्याच्याकडे पाहून आजूबाजूच्या लोकांना “उचलून घेऊन जा रे याला. मी असल्याला हात लावत नसतो.” ‘यातलं बिटवीन द लाईन्स’ कळायला मेंदू लै तल्लख लागतो माझ्या सोन्या… दादा ह्यो ‘दादा’ मानूस व्हता !

दादा, तुमच्यासारखा एकीकडे खळखळून हसवत, दूसरीकडं अतिशय अभ्यासपूर्वक, समाजातल्या विसंगतीवर बोट ठेवून, उघडंनागडं ‘सत्य’ बोलनारा एकही कलावंत आज आमच्या अवतीभवती दिसत नाही… अभिनेत्याकडं समाजभानातनं आलेली निर्भिडता आणि विद्रोह या गोष्टी अंगी असणं हे अत्यंत गरजेचं आहे, हेच बहुसंख्य कलाकारांना माहिती नाही.

‘तुमचं आमचं जमलं’ सिनेमात तुम्ही तुमच्या वाघ्या नांवाच्या कुत्र्याला विचारता, “खोटं बोलूनी पोट भरतया म्हनून का रं जगायचं? माल कुनाचा कोन खातुया, किती दिस हे बघायचं??” …असो. “गेली सांगून द्यानेसरी..मानसापरास मेंढरं बरी !” हेच खरं. मिस यु दादा. लब्यू लैच”, असे किरण माने यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू नये म्हणून…” शक्ती कपूर यांनी सांगितला दादा कोंडकेंचा किस्सा, म्हणाले “देवाने अशी माणसं…”

दरम्यान किरण माने यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत त्यांचे कौतुक करताना दिसत आहे. या पोस्टवर ‘फारच छान लेख’, ‘अप्रतिम लेख’, अशा कमेंट पाहायला मिळत आहे.