Kiran Mane अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कायमच चर्चेत असतात. सध्या त्यांच्याबाबत त्यांच्या फेसबुक पोस्टमुळेच एक माहिती समोर आली आहे. किरण माने यांना प्रकृती बरी नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मी आयसीयूत आहे असं किरण मानेंनी फेसबुक पोस्ट करत सांगितलं आहे. त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर ही पोस्ट करण्यात आली आहे.
किरण माने कायमच चर्चेत असतात
अभिनेते किरण माने ( Kiran Mane ) कायमच त्यांच्या खास पोस्टसाठी चर्चेत असतात. वारी सुरु असताना त्यांनी तुकाराम महाराज, अनगडशाह दर्गा याबाबत पोस्ट लिहून वारीने एकात्मता कशी जपली आहे? याविषयीची माहिती दिली. तसंच उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारी त्यांची पोस्ट असो किंवा नरेंद्र मोदींवर टीका करणारी पोस्ट असो त्यामुळेही ते चर्चेत राहिले होते. ते कायमच त्यांची रोखठोक मतं त्यांच्या पोस्टमधून मांडत असतात. त्यावर अनेक जण कमेंटही करतात. आता किरण माने यांनी जी पोस्ट केली आहे ती चर्चेत येण्याचं कारण त्यांची प्रकृती. आपण आयसीयूत दाखल झालो आहोत असं किरण माने ( Kiran Mane ) यांनी पोस्ट करुन सांगितलं आहे. किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर ही पोस्ट केली आहे. त्यात काळजी करु नका असंही ते म्हणाले आहेत. मात्र किरण माने यांनी पोस्ट केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना काळजी घ्या असं आवाहन केलं आहे.
हे पण वाचा- किरण माने यांची आषाढीच्या निमित्ताने पोस्ट, “आपला तुकोबाराया विठ्ठलामध्ये गौतम बुद्धाला बघत होता…”
किरण मानेंची फेसबुक पोस्ट काय?
किरण माने यांनी ( Kiran Mane ) त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, “काल दुपारपर्यंत फिट, तंदुरुस्त, हसत खेळत होतो. आज आय.सी.यू, सलाईन, इंजेक्शन, गोळ्या तपासण्या आणि प्रचंड असह्य वेदना. आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं ! अर्थात, यावरही मात करून यातून बाहेर पडेन. फिकीर नॉट.” किरण माने यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना काळजी घेण्यास सांगितलं आहे.
किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे
ही पोस्ट अभिनेते किरण माने यांनी फेसबुकवर केली आहे. किरण माने यांनी केलेल्या या पोस्टवर आत्तापर्यंत ३५० हून अधिक जणांनी कमेंट केल्या आहेत. तसंच अनेकांनी काळजी असल्याचं स्मायली करत ही पोस्ट लाईक केली आहे. किरण माने यांना नेमकं काय झालं आहे ते अजून त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. पण आयसीयूत दाखल आहेत हेच त्यांची पोस्ट सांगते आहे. त्यामुळे या पोस्टवर कमेंट करणाऱ्या सगळ्यांनीच त्यांना काळजी घेण्याचा, लवकर बरं होण्याचा सल्ला दिला आहे.