‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेते किरण माने सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. या मालिकेत त्यांनी साकारलेली माऊच्या वडिलांची भूमिका ही अधिक गाजली होती. पण अचानक मालिका सोडल्यानंतर ते खूप चर्चेत आले. त्यांच्यावर मालिकेतील काही कलाकार मंडळींनी आरोप केले. पण तरीही ते त्याला सडेतोड प्रत्युत्तर माध्यमातून आणि सोशल मीडियावरद्वारे देत होते. असे हे नेहमी चर्चित असलेले किरण माने या वादानंतर बिग बॉस मराठीमध्ये झळकले. यामुळे ते अधिक प्रसिद्धीझोतात आले. आता किरण माने नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

हेही वाचा – ‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली, कारण सांगत चिन्मय मांडलेकर म्हणाला…

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Trending video boy from village singing song of nathicha nakhara goosebumps came on people after listing his song viral video
“नथीचा नखरा नऊवारी साडी” शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला लावलं वेड; सूर असा की अंगावर येतील शहारे, VIDEO पाहाच
urmila kothare first post after car accident
“रात्री १२.४५ च्या सुमारास माझ्या गाडीचा…”, अपघातानंतर उर्मिला कोठारेची पहिली पोस्ट; सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
govinda wife sunita reveals actor hit two girls in college
“एका मुलीच्या तोंडावर गरम दूध फेकलं, तर दुसरीला…”, १८ व्या वर्षी सुनीताने केलेलं गोविंदाशी लग्न, ‘त्या’ प्रसंगानंतर झालेली पहिली भेट

‘कलर्स मराठी’वरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत किरण माने झळकणार आहे. त्यांनी मालिकेत सिंधुताईच्या वडिलांची म्हणजेच अभिमान साठे यांची भूमिका साकारली आहे. आजपासून ही मालिका सुरू होतं आहे. त्यानिमित्तानं किरण माने यांनी नुकतीच एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Bigg Boss OTT 2: अभिषेक मल्हान की एल्विश यादव कोण आहे जास्त श्रीमंत? जाणून घ्या दोघांची नेटवर्थ

किरण मानेंची पोस्ट वाचा…

आज ‘स्वातंत्र्य दिना’च्या दिवशी मी परत येतोय, ताठ मानेनं, ताठ कण्यानं…दीड वर्षापूर्वीच्या ‘त्या’ दिवशी, ती घटना घडल्यावर मी फेसबुकवर येऊन म्हणालो होतो…
“काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा…
गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा!”

आज ते सिद्ध करून दाखवलं. पण मला आनंद होतोय तुमच्यासाठी. ‘त्या’ सगळ्या काळात तुम्ही मायबाप प्रेक्षक माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात. मला पूर्वीपेक्षा शंभरपटींनी प्रेम दिलंत. त्यामुळं आज या क्षणी नम्रपणे तुम्हा चाहत्यांच्या पायाशी रहाणं, हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त आनंदाचं असेल.

मी जी कलाकृती तुमच्यासाठी घेऊन येतोय, ती साधीसुधी नाय माझ्या भावांनो. शेकडो संकटांचा पहाड पार करून, हजारो अनाथांची माय झालेल्या सिंधुताईंवरची मालिका आहे ही. माईंच्या काळजात ज्या व्यक्तीबद्दल ‘स्पेशल’ जागा होती.. ज्यानं माईंच्या व्यक्तीमत्त्वाचा पाया घातला, तो तुम्हाला माहित नसलेला ‘अनसंग हिरो’ मी साकारणार आहे. पैज लावून सांगतो, तो आणि त्याच्या लेकीमधला गहिरा जिव्हाळा पाहून तुम्ही हरवून जाल. हरखून जाल. यांना रोज भेटायची ओढ लागेल तुम्हाला.

…त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळून फक्त एक वर्षच झालंवतं जेव्हा विदर्भातल्या एका छोट्या खेड्यातल्या, त्या माणसाच्या घरी हे अफलातून लेकरू जन्माला आलं. आपली भुमी स्वतंत्र झालीवती, पण आपल्या जुनाट समाजव्यवस्थेतनं ‘स्त्री’ मुक्त नव्हती झाली. ती चारभिंतीच्या आत गुलामगिरीचे चटके सोसतच होती.

अशा काळात सख्ख्या आईसकट सगळ्यांनी नाकारलेल्या लेकीला पोटाशी धरणारा…जीव लावणारा…तिला जोपासणारा…घडवणारा…’बापमाणूस’, द ग्रेट अभिमान साठे पुन्हा जिवंत करायला मिळणं, हे ‘अभिनेता’ म्हणून सुख आहे हो… निव्वळ सुख

‘कमबॅक’ अजून कसा पायजे सांगा बरं?

माझी खात्रीय आजपासून रोज संध्याकाळी ७ वाजता ‘कलर्स मराठी’ चॅनलवर येऊन, हा अद्भूत प्रवास तुम्ही बघणार आहातच..पण तुमच्या मुलाबाळांनासुद्धा आवर्जुन दाखवा… कलर्स मराठी वाहिनीचे मनापास्नं आभार

– किरण माने

हेही वाचा – “डान्सर असल्यामुळे मराठी इंडस्ट्रीत…”, अभिनेत्रीने खंत व्यक्त करत सांगितला अनुभव, म्हणाली…

दरम्यान, ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत बालपणीच्या सिंधुताई म्हणजेच चिंधीच्या भूमिकेत बालकलाकार अनन्या टेकवडे दिसणार आहे. तसेच प्रिया बेर्डे या सिंधुताईंच्या आजी म्हणजेच पार्वती साठे यांची भूमिका साकारणार आहेत. तर सिंधुताईंच्या आईच्या भूमिकेत योगिनी चौक पाहायला मिळणार आहे.

Story img Loader