अभिनेते आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी किरण माने जितके त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. तितकेच ते त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे किरण माने अधिक प्रसिद्धीझोतात आले. त्यानंतर किरण माने मालिका, चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहेत. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२९ डिसेंबरला सातवा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात ‘निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. किरण माने यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याच्याच आनंदात किरण मानेंनी सुंदर पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – बहुप्रतीक्षित Squid Game 2 वेब सीरिजसाठी तयार व्हा; कधी, कुठे प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

किरण मानेंची पोस्ट वाचा

हॅलो किरण माने सर… संदीप ससाणे बोलतोय. अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षीपासून ‘निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार’ सुरू करतोय…पहिलाच पुरस्कार तुम्हाला द्यायचा यावर आमच्या निवड समितीचं एका क्षणात एकमत झालं. तुमच्या होकाराची अपेक्षा आहे.

काय उत्तर द्यावं सुचेनाच. आनंदानं मन भरून आलं, डोळे पाणावले. ‘अण्णाभाऊ-निळूभाऊ’ म्हणजे कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून मला समृद्ध करणारे माझे आदर्श. निळूभाऊंना तर मायणीच्या तंबूत पाहिलेल्या ‘पिंजरा’पासून परिवर्तनाच्या चळवळीतल्या भाषणांपर्यंत मी वेड्यासारखं ‘फॉलो’ केलं…नंतरच्या काळात मला अल्पकाळ का होईना सहवास लाभला. चक्क सातारच्या माझ्या घरीही ते आले!

निळूभाऊंच्या नावानं पुरस्कारासारखं दुसरं सुख नाही…हे समजल्यापासून हवेत तरंगतोय…आजपर्यंत ज्या-ज्या अ‍वार्डमधून कारस्थानानं माझा पत्ता कट झाला त्या सगळ्या ट्रॉफ्यांची किंमत एका फटक्यात शून्य करून टाकणारा हा बहुमान आहे. मराठी कलाक्षेत्रात सर्वोच्च स्थानावर जे नाव आहे, त्या नावानं असलेला पुरस्कार हा मी तेवढ्याच रुबाबात आणि टेचात स्वीकारणार…कारण माझा संघर्ष मला सांगतोय… अभिनयासाठी मी खाल्लेल्या खस्ता मला सांगतायत… शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचा प्रसार करतो म्हणून इंडस्ट्रीतल्या वर्चस्ववाद्यांनी माझ्या पोटावर मारलेली लाथ मला सांगतेय… त्यावेळचे माझ्या आईवडिलांच्या डोळ्यांतले अश्रू मला सांगतायत… की हो, मी हा पुरस्कार डिझर्व करतो.

निळूभाऊ, तुमच्यासमोर मी कायम नतमस्तक आहे. तुम्ही दाखवलेल्या मार्गावरून प्रवास करत राहीन…तुम्ही आणीबाणीच्या काळात नागपूरच्या चौकात निडरपणे केलेलं भाषण असो… परिवर्तनाच्या चळवळीत केलेली व्याख्यानं असो…तथाकथित धर्मांध संस्कृतीरक्षकांना झुगारून केलेले ‘सखाराम बाईंडर’चे प्रयोग असोत…’कोण म्हणतं टक्का दिला’ सारखं दलित चळवळीच्या विचारांचं नाटक प्रोड्यूस करणं असो…’अभिनेत्याला समाजभान नसेल आणि भवताली घडणार्‍या अराजकावर बोलण्याचा निडरपणा नसेल, तर त्याची कला पोकळ आणि क्षुद्र ठरते’, हे तुम्ही मला शिकवलंय आणि मी ते शंभर टक्के अंगीकारलंय. सलाम निळूभाऊ.

-किरण माने.

हेही वाचा – KBC 16 : अमिताभ बच्चन ATM मध्ये कधीच गेले नाहीत, जया बच्चन यांच्याकडून घेतात पैसे, म्हणाले…

हेही वाचा – केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार

दरम्यान, किरण मानेंच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘कलर्स मराठी’वरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत ते झळकले होते. सिंधुताईंच्या वडिलांची भूमिका किरण मानेंनी साकारली होती. त्यानंतर ते ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तिकळी’ मालिकेत झळकले. पण काही दिवसांत किरण मानेंनी ही मालिका सोडली. सध्या किरण माने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘# लय आवडतेस तू मला’ मालिकेत पाहायला मिळत आहेत.