शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना यातील शाहरुख खानचे वेगवेगळे लूक्स पसंत पडले आहेत. आता या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संपूर्ण चित्रपटसृष्टीतसुद्धा याच चित्रपटाची चर्चा आहे. कलाकार या चित्रपटाबद्दल भरभरून बोलत आहेत. अभिनेते किरण माने यांनीही नुकतंच एक पोस्ट करत शाहरुख खानचं तोंडभरून कौतुक केलं आहे. किरण माने यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून खरंतर ते घराघरात पोहोचले. त्यानंतर झालेल्या वादामुळे ते आणखी प्रकाशझोतात आले. नंतर बिग बॉस मराठी चौथ्या पर्वात त्यांनी प्रवेश केला.

आणखी वाचा : ‘गदर २’ची ५०० कोटी क्लबमध्ये थाटात एन्ट्री; ‘या’ दोन चित्रपटांना टाकलं मागे

किरण माने सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नुकतीच त्यांची शाहरुखसाठी अन् त्याच्या ‘जवान’ चित्रपटाबद्दलची खास पोस्ट चर्चेत आहे.

आपल्या पोस्टमध्ये किरण माने लिहितात,
“बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर !” अग्ग्गाय्यायायाया… अख्ख्या देशानं घरात बसल्या-बसल्या शिट्ट्या वाजवल्यात भावा ! पिच्चर आल्यावर काय हुईल शारख्या? तू हायेसच भन्नाट,जबराट,नादखुळा तुझ्यावर जळनार्‍यांनी लै अफवा पसरवल्या दोस्ता, पन तू मागं हटला नाहीस. ट्रोलर्सच्या झुंडीनं तुला लै ट्रोल केला, लै हेटाळनी केली, पन तू भिडलास, नडलास, जिंकलास. तुझ्या पोराला अडकवून तुला झुकवन्याचा प्रयत्न झाला, पन तू तर ‘बाजीगर’ ! गप र्‍हावून बाजी पलटलीस. परत ताठ कण्यानं, उंच मानेनं उभा र्‍हायलास. भक्कम. पाय रोवून. तुझी ती ‘क़ातिल’ नजर रोखून. आजबी तुझ्या ‘मन्नत’पुढं रोज अख्ख्या भारतातनं तरूण पोरंपोरी येऊन उभी र्‍हात्यात… तासनतास तुझ्या घराकडं बघत बसत्यात… त्यांना तुझ्या जातीधर्माशी घेनंदेनं नसतं. कारन ते तुझ्यासारखेच ‘अस्सल’ भारतीय असत्यात. तुझी एक झलक दिसली तर आनंदानं नाचायला लागत्यात…येडी होत्यात. जगातला सगळ्यात लोकप्रिय कलाकार हायेस तू.

तू फक्त अभिनयातला बादशाह नाहीस, तर ‘मानूस’ म्हनूनबी तू ‘किंग’ हायेस ! ॲसिड ॲटॅक झालेल्या हजारो महिलांची आयुष्य उभी करून दिलीयस तू. नानावटी हाॅस्पीटलमध्ये लहान मुलांच्या कॅन्सरसाठी तू जो वाॅर्ड उभा केलायस त्यानं कित्येक चिमुरड्यांचे जीव वाचवलेत. तुझ्या अशा लै लै लै समाजोपयोगी कामांची जगभर दखल घेतली गेली हाय. युनेस्को अवाॅर्ड मिळवलंयस. साऊथ कोरीयापास्नं इंग्लंडपर्यन्त अनेक देशांनी यासाठी तुला सन्मानित केलंय. त्यासाठी या देशातल्या प्रत्येक सच्च्या नागरीकाला तुझा अभिमान वाटतो!

‘पठाण’च्या वेळी याच आपल्या खर्‍या देशानं दाखवून दिलं की, थयथयाट करत सेलिब्रिटींना शिवीगाळ करणार्‍या छितपूट ट्रोलर्सच्या पलीकडं, बहुसंख्य जनता आहे जी शांत असते, पन मानवतेच्या प्रसारासाठी निधड्या छातीनं लढनार्‍यांच्या पाठीशी भक्कम उभी असते. पठाण सिनेमा म्हनून लै बरा नव्हता. तुझ्या ट्रोल्सना सनसनीत उत्तर म्हनून पब्लीकनं डोक्यावर घेतला. द ग्रेट, वन ॲन्ड ओन्ली शाहरूख खान, आता येणारा ‘जवान’ मात्र लै भारी असनार. लै आतुरतेनं वाट बघतोय. ये लवकर भावा… होऊ दे जाळ न् धूर संगट… चिखलात धुरळा, पान्यात आग काढ… आम्ही आहोत तुझ्यासोबत. बघनार. ‘पठाण’सारखा परत परत बघनार. लब्यू भावा.

किरण माने यांच्या या पोस्टवर बऱ्याच लोकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. दरम्यान, किरण माने यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्यांनी सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारली असून ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.