आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला साजरा करण्यात येणारा मुख्य सण म्हणजे दसरा. या सणाला विजयादशमी म्हणूनही ओळखले जाते. हा सण वाईटावर चांगल्याचे प्रतीक मानला जातो. या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून दुष्टाईचा अंत केला, तर दुसऱ्या मान्यतेनुसार, दुर्गामातेने नऊ दिवसांच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला, असे मानले जाते. संपूर्ण भारतात दसरा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. नुकतंच या निमित्ताने अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरण माने हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी काही तृतीयपंथीयांचे फोटो पोस्ट केले आहेत. त्याबरोबरच त्यांनी घडलेला किस्साही सांगितला आहे.
आणखी वाचा : दीर्घकाळानंतर भरत जाधव यांचे रंगभूमीवर पुनरागमन, एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

किरण माने यांची पोस्ट

“…आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या अनोख्या चाहत्यांनी दसर्‍याच्या आदल्या दिवशीच माझा दिवस सोन्याचा केला !

काल अचानक काही तृतीयपंथी लोक अत्यंत प्रेमानं, आवर्जुन, खास माझा पत्ता शोधत मला भेटायला आले. मला पाहून भारावून बोलू लागले, “किरणजी,तुमच्या भुमिका आमच्या काळजात कोरल्यात आम्ही. विलास पाटील आणि सिंधुताईंचे वडील पाहिल्यानंतर कायम वाटायचं असा बाप आम्हाला लाभायला पाहिजे होता. मलाही चिंधीसारखीच शिकायची आवड होती. बिगबाॅसमध्ये असताना तुम्हाला खूप व्होटिंग केलं आम्ही….” ऐकताना माझे डोळे पाणावत होते.

खास माझ्यासाठी जेजुरीच्या खंडोबाच्या गाण्यावर त्यांनी डान्स केला. “आम्ही वरचेवर तुम्हाला भेटायला येऊ. प्रत्येक वेळी यशाची पायरी वर चढलेली दिसणार आहे आम्हाला. तुम्ही खूप खूप मोठे व्हाल… सुपरस्टार व्हाल. जगात नांव होईल. आमचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.” असं म्हणून लाखमोलाचा आशिर्वाद देऊन गेले…

बाकी कायबी असो भावांनो, ही अशी माया लै कमीजणांना लाभते. फॅन्सच्या ‘लाईव्ह’ प्रेमाबाबतीत मी लै लै म्हंजे लैच भाग्यवान हाय ! कलाकार आहे मी. जसे चाहते आहेत, तसे काही निंदक, ट्रोलही आहेत… पण माझा द्वेष करणार्‍यांचा मला जरासुद्धा राग येत नाही… कारण त्यांच्यामुळंच तर माझ्या चाहत्यांच्या अफाट प्रेमाची किंमत किती मोलाची आहे, हे मला कळतंय. बहुत छोटे हैं मुझ से मेरे दुश्मन..जो मेरे चाहनेवाले हैं, मुझ से बड़ॆ है ! लब्यू”, असे किरण माने यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : निवेदिता सराफ यांचे वय किती? स्वत:च खुलासा करत म्हणाल्या, “मला लाज…”

दरम्यान किरण माने यांच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. सध्या किरण माने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेत त्यांनी सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारली असून ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor kiran mane share dussehra special post meet transgender nrp