मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता किरण माने हे ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे सातत्याने प्रसिद्धीझोतात आहेत. तल्लख बुद्धीच्या जोरावर किरण मानेंनी टॉप ३ मध्ये स्थान मिळवले. बिग बॉसच्या घरातून आल्यानंतर किरण माने हे विविध प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. किरण माने यांच्या मुलीचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक खास पोस्ट केली आहे.

किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लेक ईशा मानेबरोबर एक गोड फोटो पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देताना त्यांनी त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास आणि तिचा जन्म याबद्दल एक किस्सा सांगितला आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये संधी कशी मिळाली? शिवाली परबने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “आगरी भाषा…” 

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…

किरण माने यांची पोस्ट

“तो दिवस अजून लख्ख आठवतोय. स्कूटरवरून माझ्या इंजिन ऑईलच्या दुकानात जाता-जाता हाॅस्पीटलमध्ये थांबलो. माझी एक दिवसाची छोटी छकुली हातात घेतली… गोड हसली माझ्याकडं बघून… मनात विचार आला ही मोठी झाल्यावर “तुझे बाबा काय करतात?” या प्रश्नाचं काय उत्तर देईल? म्हणेल,”ते दुकानदार आहेत. ऑईल, स्पेअरपार्टस् विकतात.” माझ्या अंगावर सर्रर्रर्रकन काटा आला ! म्हन्लं नाय नाय नाय नाय… मला ही ओळख नको. दुकानदारी करणं वाईट नाही, पण माझी पॅशन, माझा श्वास, माझ्या रक्तात ‘अभिनय’ आहे. कितीही संकटं येऊदेत. काहीही होऊदेत. जग इकडचं तिकडं होऊदेत. मला अभिनय करत रहाण्याचा आनंद घ्यायचाय. माझ्या पोरीनं कधीही अभिमानानं सांगीतलं पायजे “माझे बाबा ॲक्टर आहेत.”

अस्वस्थ झालो… सैरभैर अवस्थेत स्कूटर काढली… स्कूटर तिरकी करून दहा किका मारल्याशिवाय स्टार्ट होत नव्हती… विचारात असल्यामुळं किक मारताना पाय सटकून नडगीवर दणका बसला…खण्ण्णकन. मेंदूत कळ गेली. पण दुर्लक्ष केलं. कारण त्यापेक्षा काळजातली उलघाल जास्त जीवघेणी होती. दुकानात येऊन बसलो. मनात तेच विचार… मला अभिनेता म्हणून जगायचंय… ही दुकानदारी, ही हिशोबाची वही, हा गल्ला, हे माझं जग नाही. सगळ्या ऑईलच्या कॅन्समध्ये मी गुदमरून चाललोय असा भास व्हायला लागला… त्याचदिवशी मी पेपरात जाहिरात बघितली : ‘पं. सत्यदेव दूबे यांची पुण्यात अभिनय कार्यशाळा’… तो किस्सा मी यापूर्वी पोस्टमधून लिहीलाय. खूप व्हायरल ही झालाय. पण त्या आधीची ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीतीये…

…तर मी दुकानाचं शटर ओढलं आणि दूबेजींकडे जाऊन अभिनयाचा ध्यास घेतला. बेभरवशाचं क्षेत्र निवडल्यामुळं लै ओढाताण झाली. पैशाची कायम चणचण. घरातलं टेन्शन तर स्ट्रगलर्सच्या पाचवीला पुजलेलं. रोजचे खर्च भागवणं मुश्कील असायचं. पण कुणी विचारल्यावर लहानगी ईशा जेव्हा बोबड्या पण खणखणीत आवाजात सांगायची ना, “माजे बाबा ॲक्टल आहेत.”…तेव्हा लै लै लै भारी वाटायचं मला. सगळा ताण निवळून जायचा.

…आज तिला बघितलं की लोक म्हणतात, “ही ईशा, ॲक्टर किरण मानेंची मुलगी.” ईशाला ते रोजचं सवयीचं झालंय… पण मी जेव्हा-जेव्हा ऐकतो, तेव्हा मी आतून खूप सुखावतो. वाढदिवसाच्या मनभरून शुभेच्छा ईशा… तू माझ्या आयुष्यात बहार घेऊन आलीयेस… तुला आयुष्यात जे पायजे ते भरभरून मिळो… खूप आनंदी रहा, हसतमुख रहा… तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझा बाप पहाडासारखा तूझ्या पाठीशी उभा राहिल. लब्यू”, असे किरण माने यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “मी एवढ्या मोठ्या सन्मानासाठी पात्र आहे का?” किरण मानेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले “आंबेडकर कुटुंबियांनी…”

किरण माने यांनी केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. त्यातील अनेकांनी ईशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी किरण मानेंच्या या पोस्टचे कौतुक केले आहे.